मुंबई : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तेजस देऊस्कर दिग्दर्शित ‘देवमाणूस’ चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मराठी सिनेसृष्टीतूनही या ट्रेलरवर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच बॉलिवूडचा ‘सिंघम’ अजय देवगणलाही या ट्रेलरने भुरळ घातली आहे.
आपल्या सोशल मीडियावर ट्रेलर पोस्ट करत त्याने निर्माते लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या मराठीतील पदार्पणाबद्दल अभिनंदन करत, ट्रेलर खूपच उत्कंठावर्धक आहे, देवमाणसाची सटकली की काय होते…?, असे म्हणत संपूर्ण टीमला चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर राजकुमार राव, अर्जुन कपूर, सनी सिंग यानेही या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत.
लव फिल्म्स प्रस्तुत ‘देवमाणूस’ या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊस्कर यांनी केले असून, लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी निर्मिती केली आहे. महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे, सिद्धार्थ बोडके यांच्या भूमिका असणारा हा चित्रपट येत्या २५ एप्रिल २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
नाशिक : नाशिक - पुणे मार्गावरील काठे गल्ली सिग्नलजवळ असलेल्या अनधिकृत दर्ग्यावर महापालिका प्रशासनाने कारवाई…
मुंबई : जेईई च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी. जेईई मेन सत्र २ची २ ते ८ एप्रिल…
मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने केली कठोर कारवाई हैदराबाद : तब्बल १४ वर्षे जुन्या मनी लाँड्रिंग…
४०व्या वर्षीसुद्धा दिसू शकता सुंदर! भाजलेले हरभरे खाल्ल्याने तुमच्या शरीराला शक्ती मिळते. सर्वांच्या घरी हा…
अमरावती : राज्यभरात उन्हाचा कडाका (Summer Heat) वाढत चालला असून उन्हाच्या वाढत्या झळांसह नागरिकांना पाण्याची…
मुंबई:‘अशी ही बनवाबनवी’, ‘झपाटलेला’, ‘धडाकेबाज’, ‘अफलातून’, ‘हमाल दे धमाल’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, ‘प्यार किया तो…