प्रसाद ओक, सई ताम्हणकरचा 'गुलकंद' सिनेमाचा धमाल ट्रेलर रिलीज, तुम्ही पाहिलात का?

मुंबई : प्रसाद ओक, सई ताम्हणकर, समीर चौगुले आणि ईशा डे यांचा 'गुलकंद' हा मराठी सिनेमा लवकरच रिलीज होत आहे. नुकताच या सिनेमाचा धमाल ट्रेलर रिलीज झाला आहे. एकंदर मजेदार कॉमेडी सिनेमा पाहायला मिळणार आहे. या ट्रेलरमधून कथेचा अंदाज येतो.

गुलकंद'ही दोन जोडप्यांची कथा आहे. प्रसाद ओक आणि ईशा डे नवरा बायको आहेत. तर सई आणि समीर चौघुले यांची जोडी आहे. सई-समीरची मुलगी आणि प्रसाद-ईशाचा मुलगा एकमेकांच्या प्रेमात पडतात. तर दुसरीकडे प्रसाद आणि सई यांच्यात लग्नाआधी अफेअर असतं.

मुलांच्या निमित्ताने दोघं पु्न्हा भेटतात. इतक्या वर्षांनी भेटल्यावर प्रसाद आणि सई यांच्यात पुन्हा लफडं सुरु झालंय अशी शंका समीर आणि ईशाला येते. ते त्यांचा पाठलाग करतात. दोन्ही जोडप्यांच्या नात्याचं पुढे काय होतं हे सिनेमात बघायला मिळणार आहे. कॉमेडी आणि थोडा भावुक अशा क्षणांची सरमिसळ सिनेमात आहे.

lkand

एव्हरेस्ट एंटरटेनमेंटने प्रस्तुत आणि वेलक्लाऊड प्रॉडक्शन्स निर्मित, सचिन मोटे लिखित, सचिन गोस्वामी दिग्दर्शित 'गुलकंद या चित्रपटात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत आणि शार्विल आगटे यांच्या मुख्य भूमिका आहेत. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया हे चित्रपटाचे निर्माते आहेत. हा सिनेमा १ मे २०२५ ला रिलीज होणार आहे.
Comments
Add Comment

'हि-मॅन'ला शेवटचे पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता; नवीन वर्षाची सुरुवातच होणार देशभक्तीने

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. मात्र बॉलिवूडचा हि-मॅन कायमच आपल्या

घट्ट करा मान, थंड करा मस्तक अन् ऐका दारावरची दस्तक; बिग बॉस मराठीच्या नव्या प्रोमोची जोरदार चर्चा

बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनची चर्चा सुरू असतानाच स्पर्धेचा अधिकृत प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला

देवदास ते दिल तो पागल है - २०२५ मध्ये पुन्हा झळकलेले आयकॉनिक हिंदी चित्रपट

क्लासिक ते कल्ट : २०२५ मध्ये सिनेमागृहांत पुन्हा झळकलेले आयकॉनिक हिंदी चित्रपट नॉस्टॅल्जिया हा मोठा सिनेमॅटिक

'आयुष्यभराचा सॅंटा' म्हणत मराठी अभिनेत्रीने करून दिली होणाऱ्या नवऱ्याची ओळख

मराठी सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई दिसून येत आहे. बिग बॉस मराठीच्या घरातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या

नृत्य, संगीत आणि प्रकाशाचा अद्भुत त्रिवेणी संगम!

नेहमीच्या सादरीकरणापेक्षा काहीतरी नवीन आणि अविस्मरणीय अनुभव देणारा 'रिदम ऑन फायर' हा खास डान्सिकल कार्यक्रम

निवडणुकांच्या रणधुमाळीत ‘आणीबाणी’ ओटीटीवर

मनोरंजन विश्वात ओटीटीने विशेष स्थान निर्माण केले आहे. ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि वेब सिरिजची