Gauhar Khan : अभिनेत्री गौहर खान होणार दुसऱ्यांदा आई!

मुंबई : 'बिग बॉस ७'ची विजेती अभिनेत्री गौहर खान (Gauhar Khan) दुसऱ्यांदा आई होणार आहे. नुकतीच तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही गुडन्यूज दिली. ५ वर्षांपूर्वीच गौहरने जैद दरबारसोबत निकाह केला होता. तर २०२३ साली तिने पहिल्या बाळाला जन्म दिला. गौहर आणि जैदने गोंडस मुलाला जन्म दिला होता. तर आता लेकाच्या जन्मानंतर दोन वर्षात गौहर दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. बाळाच्या स्वागतासाठी गौहर आणि जैद आतुर आहेत.


गौहर खानने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती पती जैदसोबत एका व्हायरल गाण्यावर डायलॉग्स बोलतेय आणि डान्स करतेय. नंतर जैद गौहरच्या बेबी बंपवर हात ठेवतो. अशा पद्धतीने दोघंही गुडन्यूज रिव्हील करतात. गौहरने यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले,"तुमच्या प्रेमाची आणि प्रार्थनेची गरज आहे. बेबी २..."





गौहरच्या या पोस्टवर चाहते आणि इतर कलाकार कमेंट करत प्रेमाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. लॉकडाऊनमध्ये गौहर आणि जैद यांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली होती. जैदने तिला सुपरमार्केटमध्ये पाहिलं होतं. तिथेच तो तिच्या प्रेमात पडला. त्याने लगेच तिला मनातील भावना सांगितल्या. दोघं इन्स्टाग्रामवर बोलायला लागले. त्यांच्यात मैत्री झाली, मग ते प्रेमात पडले.

Comments
Add Comment

छत्रपती शिवाजी महाराज सिनेमात झळकणार धुरंधर २ मधील 'हा' अभिनेता

भारतीय सिनेमात सध्या ऐतिहासिक सिनेमांचा ट्रेंड सुरु असून लवकरच 'द प्राइड ऑफ भारत : छत्रपती शिवाजी महाराज' हा

Dhurandhar 2 : २४ वर्षीय रॅपरची कमाल, धुरंधरमधील 'आरी आरी' रॅपनं जिंकली प्रेक्षकांची मने

रणवीर सिंहच्या धुरंधर २ सिनेमानं जगभरात धूमाकूळ घातला असून सध्या धुरंधर द रिव्हेंजमधील आरी आरी या गाणांने

धुरंधर २ चा दबदबा कायम, KGF 2 ला मागे टाकत विक्रमी कमाई

अभिनेता रणवीर सिंहच्या धुरंधर २ सिनेमाची सध्या जगभरात चांगलीच क्रेझ पाहायला मिळत असून रणवीरच्या धुरंधर २

धुरंधरमधील 'या' अभिनेत्यानं १० वर्षांपूर्वीच रणवीरसोबत बनवली होती रील

अभिनेता रणवीर सिंहच्या धुरंधरचा पहिला भाग १५ डिसेंबर २०२५ रोजी रिलीज झाला होता. यामध्ये रणवीर सिंहसोबत अनेक

नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष पदी मोहन जोशी

मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या बुधवारी झालेल्या नियामक मंडळ सभेत नियोजित १०१ व्या अखिल भारतीय मराठी

पाकिस्तानातही धुरंधरची क्रेझ,बंदी असूनही टीव्हीवर झळकतोय धुरंधर २

जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा रणवीर सिंहचा 'धुरंधर २' सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.