
मुंबई : मुंबईच्या चेंबूरमध्ये एका व्यवसायिकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. या गोळीबारामध्ये जखमी झालेल्या व्यवसायिकाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. या गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या चेंबूरमधील मैत्रीपार्क भागात एका बिल्डरवर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. सद्रुद्दीन खान असे गोळीबारात जखमी झालेल्या व्यवसायिकाचे नावं आहे. ते बुधवारी (दि.९) रात्री १०च्या सुमारास दादर येथून मुंबईच्या दिशेने जात होते. यावेळी सायन पनवेल महामार्गावर चेंबूरच्या डायमंड गार्डन परिसरात त्याची गाडी थांबली होती. याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी सद्रुद्दीन यांच्यावर चार ते पाच गोळ्या झाडल्या. या घटनेत ते गंभीर जखमी झाले असून त्यांना झेन रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

रोम : जॉर्जिया मेलोनी यांच्या नेतृत्वातील इटलीमध्ये बहुतांश वाहतूकदारांनी (ट्रांसपोर्टर्स) ९ ते १२ एप्रिलदरम्यान देशव्यापी संप पुकारला आहे. या संपात ...
या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. ही घटना शीव – पनवेल महमार्गावर घडल्याने या मार्गावर रात्री वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच चेंबूर पोलिसांना तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवून वाहनांना वाट मोकळी करून दिली. पोलिसांनी रात्री उशीरा याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पाच पथके तयार केली असून रस्त्यावरील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या माध्यमातून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.