Leopard : बिबट्यांची नसबंदी करा, असं कोण म्हणालं ?

  53

जुन्नर : जुन्नर वन विभागातील वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर २०२४ मध्ये केंद्र शासनाकडे बिबट्यांची जेरबंद करून नसबंदी करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. मात्र, सध्या जुन्नरसह नाशिक, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांतही बिबट्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांतील बिबट्यांचीही नसबंदी व्हावी, यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली आहे.



वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात होणाऱ्या मानवी व पशुधन हानीसाठी राज्य शासनाकडून नुकसानभरपाईची तरतूद आहे. या योजनेमध्ये कोंबड्यांचा समावेश नसल्याचे आढळून आले आहे. ग्रामीण भागात कोंबडीपालन हे अनेक शेतकऱ्यांचे मुख्य उपजीविकेचे साधन आहे. बिबट्या अथवा इतर वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये कोंबड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे कोंबड्यांनाही नुकसानभरपाई योजनेत सामावून घेण्यात यावे, अशीही मागणी आमदार तांबे यांनी केली आहे.



बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांच्या जनावरांवर, पाळीव प्राण्यांवर आणि काही वेळा थेट मानवावर होणाऱ्या हल्ल्यांमुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे शाश्वत उपाययोजना म्हणून बिबट्यांची नसबंदी करणे गरजेचे आहे.

"बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे केवळ मानवी जीवितहानी होत नाही, तर पाळीव जनावरांचे नुकसान आणि शेतीचेही मोठे नुकसान होत आहे. ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. यावर तातडीने तोडगा काढणे गरजेचे असून, बिबट्यांची नसबंदी हा एक प्रभावी उपाय ठरू शकतो. त्यामुळे केंद्र सरकारने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात," असे आवाहन आमदार सत्यजीत तांबे यांनी केले आहे.
Comments
Add Comment

महादेवी हत्तिणीला ‘वनतारा’मध्ये पाठवण्याबाबतचा अहवाल

पेटा संस्थेमार्फत सत्यपरिस्थिती नमूद कोल्हापूर : महादेवी या हत्तिणीला कोल्हापूर मधील एका मठातून वनतारा येथे

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची