Thane News : राम गणेश गडकरी रंगायतन मे महिन्यात ठाणेकरांच्या सेवेत दाखल होणार!

Share

ठाणे : नाट्यरसिकांसाठी आणि कलाकारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ठाण्याचे भूषण व सांस्कृतिक ओळख असलेले समस्त नाट्यकलावंताचे हक्काचे व्यासपीठ ठरलेले राम गणेश गडकरी रंगायतन मे महिन्यामध्ये ठाणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. याबाबत कामाची गती वाढविण्याचे निर्देश झालेल्या पाहणी दौऱ्यात खासदार नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला दिले. ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्टची सोय, नाट्य व सिनेमांसाठी लागणारी ध्वनी व्यवस्था, आरामदायी आसनव्यवस्था, अशा अत्याधुनिक सोईंनी ठाणेकरांसाठी सज्ज होत असून आतापर्यत महापालिकेने केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच रंगकर्मीना गैरसोय होणार नाही यासाठी त्यांना आवश्यक असलेल्या सर्व आवश्यक असलेल्या बाबींचा अंतर्भाव करण्याच्या सूचनाही खासदारांनी यावेळी दिल्या.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सूचनेनुसार खासदार नरेश म्हस्के यांनी काल (दि ८) राम गणेश गडकरी रंगायतनच्या कामाची पाहणी केली. या दौऱ्यास महापालिकेचे नगरअभियंता प्रशांत सोनग्रा, उपनगर अभियंता (विद्युत) शुभांगी केसवाणी, उपअभियंता आसावरी सोरटे कार्यकारी अभियंता भगवान शिंदे, आदी उपस्थित होते. तर नाट्यनिर्माता संघाचे संतोष काणेकर, दिगंबर प्रभू, प्रसाद कांबळी, अभिनेता विजू माने, नरेंद्र बेडेकर हे देखील उपस्थित होते.

संपूर्ण रंगायतनची पाहणी दरम्यान रंगायतनच्या पाठीमागच्या लॉनमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात येत असलेल्या लिफ्टच्या जागेची पाहणी केली. त्याचप्रमाणे रंगायतनमधील सर्व स्वच्छतागृहाची पाहणी करत असताना स्वच्छतागृहात कायम स्वच्छता राहील या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. स्वच्छतेबाबत नाटकांसाठी येणाऱ्या नागरिकांनी देखील सजग राहणे गरजेचे आहे. नाटकाला येणाऱ्या प्रेक्षकांना प्रेक्षागृहात खाद्यपदार्थ आणू नयेत अशा सूचना दिल्या जातात, परंतु प्रत्येक बाबीसाठी कडक नियम करणे शक्य नसते यासाठी नाटकाला येणाऱ्या रसिकांनी देखील आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवणे गरजचे असल्याचे खासदार श्री. म्हस्के यांनी नमूद केले.

रंगायतनच्या मुख्य सभागृहाची पाहणी करत असताना आसनव्यवस्था या आरामदायी असाव्यात. तसेच स्टेजवरची ध्वनीव्यवस्था सर्वोत्तम दर्जाची असावी, रंगमंचावरील ध्वनीव्यवस्था व प्रेक्षागृहातील ध्वनी व्यवस्था स्वतंत्र असल्या पाहिजेत असेही खासदार श्री. म्हस्के यांनी नमूद केले. त्याचप्रमाणे वातानुकूलित यंत्रणा ही दोन्ही ठिकाणी स्वतंत्र ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. प्रेक्षागृहात लाईटव्यवस्था, ध्वनी व्यवस्था यंत्रणेसाठी पीठात पुरेशी व्यवस्था करावी तसेच पीठाची उंची मर्यादित ठेवावी जेणेकरुन पहिल्या रांगेतील प्रेक्षकांना त्याचा त्रास होणार नाही. तसेच प्रोजेक्टरची व्यवस्था करण्याबाबतही त्यांनी सूचित केले. नुतनीकरण करत असताना प्रेक्षागृहातील बाल्कनीमधून देखील संपूर्ण स्टेज दिसेल अशी व्यवस्था केल्याबद्दल खासदारांनी समाधान व्यक्त केले.

कलाकारांना वेशभूषा करण्यासाठी असलेल्या ग्रीन रुमची पाहणी करुन खासदारांनी समाधान व्यक्त केले. एकाच वेळी अनेक कलाकारांना तयार होता येईल अशा पध्दतीने आरसे, विद्युत व्यवस्था व वातानुकूलित यंत्रणा उपलब्ध करण्यात येत आहे. महिला व पुरूषांसाठी स्वतंत्र असलेल्या या ग्रीन रुममध्ये करण्यात आलेली यंत्रणा उत्कृष्ट असल्याचे अभिनेता विजू माने, प्रसाद कांबळी, दिंगबर प्रभू यांनी नमूद केले.

रंगायतनच्या मुख्य इमारतीवर राम गणेश गडकरी, अण्णासाहेब किर्लोस्कर, बालगंधर्व यांची शिल्पे असून त्याची माहिती ठाण्यातील नव्या पिढीला व्हावी यासाठी प्रत्येक शिल्पाच्या खाली त्यांची नावे व माहिती प्रसिद्ध करण्याच्या सूचनाही खासदारांनी दिल्या.

*गडकरी कट्टा कायम राहणार*

राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये प्रवेश केल्यावर दर्शनी भागात छोटेसे लॉन आणि बसण्यासाठी कट्टा होता, याच कट्टयावरुन अनेक रंगकर्मी घडले असल्याच्या कलाकांराच्या आठवणी आहेत. नुतनीकरण करताना सदर लॉनच्या ठिकाणी पार्किंग करणार असल्याचे समजताच या ठिकाणी पूर्वीसारखेच लॉन आणि कट्टा तयार करण्याच्या सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला दिल्या. गडकरी कट्टा ही रंगायतनची खरी शान आहे..अनेक ज्येष्ठ कलावंत याच कट्टयावरुन घडले व नवोदित कलावंत घडत आहे, त्यामुळे कट्टयाची ओळख तशीच ठेवण्याबाबत खासदारांनी सूचना दिल्या.

*नाटकाच्या सेटसाठी मॅकॅनिकल लिफ्टची सोय*

नाटकाचा सेट हा रंगमंचावर आणण्यासाठी मॅकॅनिकल लिफ्टची सोय करण्यात आलेली आहे. नाट्यनिर्मात्यांच्या अनेक वर्षापासून असलेल्या या मागणीचा नुतनीकरणात विचार केला असून या लिफ्टची देखील पाहणी खासदारांनी केली. यावेळी नाट्यनिर्माते प्रसाद कांबळी, विजू माने यांनी केलेल्या तांत्रिक सूचनांचा अंतर्भाव प्रशासनाने करावा असेही त्यांनी नमूद केले.

*प्रेक्षागृहाबाहेरील भिंतीवर ठाण्यातील रंगकर्मीची माहिती व छायाचित्र लावावीत*

मुख्य प्रेक्षागृहाच्या प्रवेशद्वाराशेजारील भिंतीवर ठाणे शहरातील नामवंत नाट्यकर्मींची छायाचित्र व माहिती प्रसिद्ध करावी, यामध्ये रंगकर्मी श्याम फडके, शशी जोशी, चंदू पारखी, जयंत सावरकर यांच्यासह ज्येष्ठ रंगकर्मीचा समावेश करावा असेही खासदारांनी नमूद केले.

*हायस्पीड अपग्रेडेड इंटरनेट सेवा उपलब्ध करावी*

रंगायतनमध्ये नाटकांसोबतच अनेक कार्यक्रम होत असतात, या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी हायस्पीड अपग्रेडेड इंटरनेट सेवा उपलब्ध करण्याच्या सूचनाही खासदार नरेश म्हस्के यांनी केल्या.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे बदलते आहे. राम गणेश गडकरी रंगायतन हा तर ठाणेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. शिवसेनेची सत्ता पहिल्यांदा ठाण्यात आली तेव्हा हिंदुहृद्यसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठाणेकरांना शब्द दिला होता की, तुम्हाला मी नाट्यगृह देईन, ते नाट्यगृह बाळासाहेबांनी ठाणेकरांसाठी दिलेले आहे. हे नाट्यगृह महाराष्ट्र राज्यातील असलेल्या सर्व नाट्यगृहांना रोल मॉडेल म्हणून ठरलेले आहे. त्यांनी दिलेली ही भेट आहे त्यात अत्याधुनिक पद्धतीने आणखीन नवीन काय देता येईल याचा विचार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला असल्याचे खासदार श्री. म्हस्के यांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केले.

Recent Posts

World Book Day : भूतकाळासह भविष्यकाळातील दुवा म्हणजेच ‘पुस्तकं’

मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…

1 hour ago

‘टीनएजर्सच्या पालकांकडून अपेक्षा’

डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…

2 hours ago

समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे

सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…

2 hours ago

राखी वटवट्या

डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…

2 hours ago

“ठाऊक आहे का तूज काही?”

श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…

2 hours ago

साहित्य म्हणजे नेमकं काय ?

गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…

3 hours ago