जीपीओसह कर्नाक बंदरपर्यंतच्या रस्त्यावरील सुमारे २५ अतिक्रमणे महापालिकेने हटवली

फेरीवाल्यांसह वाढीव जागांवरही अतिक्रमण तोडले


मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या 'ए' विभागामध्ये साबू सिद्दिक मार्ग ते कर्नाक बंदर पुलापर्यंतच्या रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या सुमारे २५ दुकाने बुधवारी ९ एप्रिल २०२५ रोजी कारवाई करण्यात आली. तसेच मुख्य डाक कार्यालय व सेंट जॉर्ज रुग्णालय परिसरात वाढीव जागा व्यापून अतिक्रमण केलेल्या दुकाने व फेरीवाल्यांवरही धडक जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.


साबू सिद्दिक मार्ग ते कर्नाक बंदर पुलापर्यंतच्या रस्त्यावर अनधिकृतरित्या व्यवसाय थाटून अतिक्रमण करण्यात आल्याचे ए' विभाग कार्यालयाच्या निदर्शनास आले. त्यानुसार सहायक आयुक्त जयदीप मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ही अतिक्रमित व अनधिकृत अशी सुमारे २५ दुकाने निष्कासित करण्याची कार्यवाही बुधवारी पार पाडली. त्यासाठी २ निरीक्षक (अतिक्रमण निर्मूलन), ८ कामगार यांच्यासह १ पोलीस उपनिरीक्षक, ५ पोलीस कॉन्स्टेबल तैनात करण्यात आले होते. एक जेसीबी, जप्त तसेच निष्कासित साहित्य वाहून नेणारे एक वाहन, एक पोलीस व्हॅन या कारवाईसाठी उपलब्ध करुन देण्यात आले होते.


तसेच, मुख्य डाक कार्यालयाजवळ सुमारे १२ ते १३ आणि सेंट जॉर्ज रुग्णालयालगतच्या गल्लीत सुमारे २० परवानाप्राप्त व्यावसायिकांनी मंजूर जागेच्या पलीकडे वाढीव जागेवर अतिक्रमण करुन व्यवसाय थाटल्याच्या तक्रारीही प्राप्त झाल्या होत्या. या दोन्ही ठिकाणीही अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी धडक कारवाई करुन वाढीव जागांवरचे अतिक्रमण हटवून त्यांचे संबंधित साहित्य जप्त केले.

Comments
Add Comment

Chakan-Talegaon Industrial Belt : चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार? खड्ड्यांसाठी प्री-कास्ट, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर

मुंबई : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना

BJP Yuva Morcha : ‘वंदे मातरम्’च्या अवमानाच्या निषेधार्थ भाजयुमो मुंबईचे जोरदार आंदोलन

मुंबई : १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी

Maharashtra New Doctors Appointed : राज्यात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

- आरोग्यमंत्र्यांनी साधला सहा लाखाहून अधिक नागरिकांची जनसंवाद मुंबई : राज्यात उपलब्ध झालेल्या १,४४० डॉक्टरांची

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे