Ahilyanagar News : शिर्डीत पकडलेल्या चार भिक्षेकऱ्यांचा जिल्हा रूग्णालयात मृत्यू

अहिल्यानगर : शिर्डीत साईभक्तांना त्रास देणाऱ्या ५० भिक्षेकऱ्यांना पोलिसांनी चार एप्रिल रोजी ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या भिक्षेकऱ्यांपैकी १३ जणांना उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उर्वरित भिक्षेकऱ्यांची रवानगी विसापूर येथील कारागृहात करण्यात आली. रुग्णालयात दाखल केलेल्या भिक्षेकऱ्यांपैकी चार जणांचा मृत्यू झाला.



भिक्षेकऱ्यांच्या मृत्यूचे कारण समजलेले नाही. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. भिक्षेकऱ्यांवर उपचार करताना हलगर्जीपणा झाला आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत.



साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत दररोज मोठ्या संख्येने भाविक येतात. येणाऱ्या भाविकांमध्ये वेगवेगळ्या आर्थिक आणि सामाजिक वर्गांतील भाविक असतात. या भाविकांना सामोरे जाऊन त्यांच्याकडे पैसे मागण्यासाठी मंदिराच्या आवारात भिक्षेकरी गर्दी करतात. शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांना भिक्षेकऱ्यांकडून होणारा त्रास वाढत होता. या संदर्भात तक्रारी वाढू लागल्यामुळे पोलिसांनी कारवाई केली. शिर्डीत साईभक्तांना त्रास देणाऱ्या ५० भिक्षेकऱ्यांना पोलिसांनी चार एप्रिल रोजी ताब्यात घेतले. या भिक्षेकऱ्यांमध्ये चार राज्यांतील बारा जिल्ह्यांतील भिक्षेकरी होते. न्यायालयाच्या आदेशानंतर भिक्षेकऱ्यांची रवानगी विसापूर येथील कारागृहात करण्यात आली होती. आजारी असलेल्या भिक्षेकऱ्यांना रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयातच उपचार घेत असलेल्यांपैकी चार भिक्षेकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. भिक्षेकऱ्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजलेले नाही. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. तपासाअंती कायद्यानुसार दोषींवर कारवाई केली जाणार आहे.
Comments
Add Comment

Badge for Ola-Uber drivers : ओला, उबर आणि बाईक टॅक्सी चालकांना १ ऑगस्टपासून 'बॅच' बंधनकारक

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; बाईक टॅक्सीला प्रतिदिन ५ रुपये आणि प्रतिराईड २ टक्के कर आकारणार मुंबई : राज्यात

Ahilyanagar : भंडारदऱ्यात निसर्गाचा हाहाकार ! 24 तासांत 300 मिमी पाऊस; प्रमुख पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी बंद

Ahilyanagar Rain : महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यात पावसाचा तांडव पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी नद्या, धरणे दुथडी भरून

Chandrashekhar Bawankule: पूरग्रस्तांना तातडीने मदत, एकाही नुकसानग्रस्ताला वंचित ठेवणार नाही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : राज्यातील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रशासन हायअलर्टवर असून, पूरग्रस्तांना तातडीने मदत

Ketan Agrawal murder case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्वीस्ट; सिया आणि चेतनचे ४ महिन्यांपूर्वीच 'गुपचूप' लग्न?

पुणे : पुण्यातील लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवाल (Ketan Agrawal) यांच्या हत्याप्रकरणात तपासादरम्यान नवा धक्कादायक तपशील

Maharashtra rain update : महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम; पालघर, रायगडला रेड अलर्ट, अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट

मुंबई : राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी विविध

Navale Bridge traffic rule : पुण्यात नवले ब्रिज मार्गावर ४० किमी वेगमर्यादा लागू; पालखी सोहळ्यामुळे RTO चाचण्यांच्या वेळापत्रकातही बदल

पुणे : शहरातील वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी पुणे वाहतूक विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारती