अहिल्यानगर : शिर्डीत साईभक्तांना त्रास देणाऱ्या ५० भिक्षेकऱ्यांना पोलिसांनी चार एप्रिल रोजी ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या भिक्षेकऱ्यांपैकी १३ जणांना उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उर्वरित भिक्षेकऱ्यांची रवानगी विसापूर येथील कारागृहात करण्यात आली. रुग्णालयात दाखल केलेल्या भिक्षेकऱ्यांपैकी चार जणांचा मृत्यू झाला.
Dombivali : डोंबिवलीत मराठीवरुन वाद! महिलेने ‘एस्क्युज मी’ बोलताच तरुणांकडून मारहाण
भिक्षेकऱ्यांच्या मृत्यूचे कारण समजलेले नाही. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. भिक्षेकऱ्यांवर उपचार करताना हलगर्जीपणा झाला आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत.
Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी प्रकरणातील मास्टरमाइंड झिशान पोलिसांच्या ताब्यात!
साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत दररोज मोठ्या संख्येने भाविक येतात. येणाऱ्या भाविकांमध्ये वेगवेगळ्या आर्थिक आणि सामाजिक वर्गांतील भाविक असतात. या भाविकांना सामोरे जाऊन त्यांच्याकडे पैसे मागण्यासाठी मंदिराच्या आवारात भिक्षेकरी गर्दी करतात. शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांना भिक्षेकऱ्यांकडून होणारा त्रास वाढत होता. या संदर्भात तक्रारी वाढू लागल्यामुळे पोलिसांनी कारवाई केली. शिर्डीत साईभक्तांना त्रास देणाऱ्या ५० भिक्षेकऱ्यांना पोलिसांनी चार एप्रिल रोजी ताब्यात घेतले. या भिक्षेकऱ्यांमध्ये चार राज्यांतील बारा जिल्ह्यांतील भिक्षेकरी होते. न्यायालयाच्या आदेशानंतर भिक्षेकऱ्यांची रवानगी विसापूर येथील कारागृहात करण्यात आली होती. आजारी असलेल्या भिक्षेकऱ्यांना रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयातच उपचार घेत असलेल्यांपैकी चार भिक्षेकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. भिक्षेकऱ्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजलेले नाही. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. तपासाअंती कायद्यानुसार दोषींवर कारवाई केली जाणार आहे.