ठाणे : ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत मानकोली एम.बी.आर. येथे मुख्यजलवाहिनीस गळती होत असून गळती बंद करणे आवश्यक आहे. तसेच स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पिसे ते टेमघर जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळ जोडण्या खंडीत करण्यासाठी उद्या (दि. ९) सकाळी ९.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत शटडाऊन घेऊन सदरची कामे करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. यासाठी महापालिका स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेचा व मे. स्टेम प्राधिकरणाच्या योजनेचा १२ तासाचा शटडाऊन घेवून तातडीची कामे हाती घेणार आहे.
Grand Road Bridge : पूर्वमुक्त मार्ग ते ग्रँटरोड पुलाचे बांधकाम होणार रद्द?
परिणामी बुधवार दि.०९/०४/२०२५ रोजी सकाळी ९.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत घोडबंदर रोड, लोकमान्यनगर, वर्तकनगर, साकेत, ऋतुपार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिध्दांचल, इंदिरानगर, रुपादेवी श्रीनगर, समतानगर, सिध्देश्वर, ईटरनिटी, जॉन्सन, मुंब्रा व कळवाचा काही भाग इत्यादी भागात १२ तासांसाठी पुर्णपणे पाणी पुरवठा बंद राहील.
ठाणे महानगरपालिकेमार्फत सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.