
* जागतिक उपक्रमात १०८ पेक्षा जास्त देशांचे लोक होणार सहभागी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवार, ९ एप्रिल रोजी नवी दिल्लीत 'नवकार महामंत्र दिवस' कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यावेळी ते उपस्थितांना संबोधित देखील करतील.
नवकार महामंत्र दिवस आध्यात्मिक सुसंवाद आणि नैतिक भान निर्माण करणाऱा संस्मरणीय उत्सव आहे. जैन धर्मातील सर्वात आदरणीय आणि सार्वत्रिक मंत्र असलेल्या नवकार महामंत्राच्या सामुदायिक पठणाच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

'असे' असेल नियोजन मुंबई : उन्हाळी सुट्टीला (Summer Holiday) सुरुवात होताच अनेकजण आपला परिवार किंवा मित्रमंडळासह बाहेरगावी फिरायला जातात. यावेळी कोकणात (Konkan) ...
अहिंसा, विनम्रता आणि आध्यात्मिक उत्थानाच्या सिद्धांतांवर आधारित या मंत्राच्या माध्यमातून प्रबुद्ध व्यक्तींच्या सद्गुणांविषयी आदरभावना व्यक्त केली जाते आणि आंतरिक परिवर्तनाची प्रेरणा मिळते. आत्म-शुद्धी, सहिष्णुता आणि सामूहिक कल्याण यांच्या मूल्यांवर चिंतन करण्याची प्रेरणा देणारा हा दिवस आहे. १०८ पेक्षा जास्त देशांमधील लोक या शांतता आणि एकजुटीच्या जागतिक मंत्रोच्चारण कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.