Phule Movie Trailer : 'फुले' चित्रपट जातीयवादाचं वळण घेणार का ?

मुंबई : सध्या सिनेसृष्टीत ऐतिहासिक चित्रपटांना प्रेक्षकांकडून अधिक पसंती आहे. छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित असलेल्या छावा या ऐतिहासिक चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत काढले. प्रेक्षकांना प्रेम, मारामारी सारख्या चित्रपटांबरोबर इतिहासकालीन चित्रपट जाणून घ्यायलाही आवडतात. झी स्टुडिओज् प्रस्तुत, अभिनेता प्रतीक गांधी आणि अभिनेत्री पत्रलेखा राव यांची मुख्य भूमिका असलेला ‘फुले’ या हिंदी चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजात केलेल्या परिवर्तनवादी सुधारणांवर चित्रपटातून प्रकाश टाकण्यात आला आहे. छावा प्रमाणेच हा चित्रपट देखील प्रदर्शनापुर्वीच वादाच्या विळख्यात अडकला आहे. हिंदू महासंघाने चित्रपटाच्या ट्रेलरवर आक्षेप घेतला आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, ११ एप्रिल २०२५ रोजी जोतीराव फुले यांच्या जयंतीदिनी ‘फुले’ हा हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तत्पुर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हिंदू महासंघाने चित्रपटाच्या ट्रेलरवर आक्षेप घेतला आहे. हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना चित्रपटातील काही दृश्यांवर नाराजी व्यक्त केली.


?si=GAaVXDRVuOEStBKP


काय म्हणाले आनंद दवे?


"आम्ही चित्रपटाचे मनापासून स्वागतच करतो. असे चित्रपट प्रदर्शित व्हावेत. पण चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एक ब्राह्मण मुलगा सावित्रीबाई फुले यांच्यावर दगड-शेण फेकताना दिसला आहे. हा प्रकार दाखविण्यास आमचा विरोध नाही. तत्कालीन समाजाच्या हातून अशी काही पातके घडली असतील. परंतु महात्मा जोतीराव फुल्यांना शाळेसाठी मदत, देणगी देणारी लोक, शाळेत शिक्षक म्हणून जाणारे लोक, शाळेच्या पहिल्या तुकडीत सहा पैकी चार विद्यार्थी ब्राह्मण होते. हादेखील चित्रपटात उल्लेख आहे का? आणि उल्लेख असेल तर ते ट्रेलरमध्ये का नाही दाखवले गेले? असा आमचा सवाल आहे. चित्रपट वास्तवाला धरून नसेल तर हा चित्रपट योग्य नाही, असे हिंदू महासंघाचे मत आहे. महात्मा फुलेंच्या कार्यात आमचेही योगदान आहे, हे जर ट्रेलरमध्ये दाखविले गेले असते, तर अधिक चांगले झाले असते, असेही दवे म्हणाले आहेत. प्रत्येक काळात समाजातील काही व्यक्ती विचित्र वागलेल्या आहेत. पण त्यांचे वागणे संपूर्ण समाजाचे मत नसते. आमच्या भावनांचा निर्माते आणि सेन्सॉर बोर्डाने विचार करावा आणि तसे बदल करावेत. हवे तर काही दिवस चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यात यावे, अशीही मागणी आनंद दवे यांनी केली. तत्पूर्वी चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर आनंद दवे पुढे म्हणाले ११ एप्रिल रोजी आम्ही चित्रपट जाऊन पाहू. जर चित्रपटात एकांगी चित्रण केले असेल तर त्यापुढे आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू. "

Comments
Add Comment

भांडुप स्टेशनजवळ बेस्टच्या बसने १३ जणांना चिरडले

मुंबई : भांडुप स्टेशनजवळ बेस्टच्या बसने रात्री दहाच्या सुमारास १३ जणांना चिरडले. या अपघातात तीन महिला आणि एक

मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकाऱ्यांनी घेतली मतदान नियमावलीची माहिती अन् अनुभवले ईव्हीएम यंत्राचे प्रात्यक्षिक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरूवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार

एमपीएससी परीक्षेत प्रत्येक प्रश्नासाठी उत्तर देणे बंधनकारक

मुंबई : राज्य लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांच्या उत्तरपत्रिकेत बदल करण्यात आले

लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील दीड कोटी महिलांना ई-केवायसी करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मेट्रो 'ॲक्वालाईन' रात्रभर धावणार

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मेट्रो 'ॲक्वालाईन' रात्रभर धावणार ▪️मुंबई मेट्रो रेल

उबाठा गटाने ४२ जणांना दिले एबी फॉर्म

मुंबई: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता दुसऱ्या आणि