KKR vs LSG, IPL 2025: कोलकत्ता नाइट राइडर्स व लखनऊ सूपर जायंट्स आमने सामने

मुंबई(ज्ञानेश सावंत): आजचे दोन्ही संघ प्रत्येकी दोन सामने जिंकलेले आहेत. दोन्ही संघाची तुलना करायची झाल्यास ते एकमेकांस तुल्य बळ आहेत. लखनऊ व कोलकत्ता या दोन्ही संघांचे फळदाजीवर वर्चस्व आहे. कोलकत्ताकडे वेंकटेश अय्यर, रिंकू सिंग सारखे हिटर आहेत त्याच बरोबर सय्यमाने खेळणारे अजिंक्य रहाणे, रघुवंशी आहेत. समोरच्या संघात भेदक सलामीवीर आहेत, मार्श व मकरम सुरवाती पासूनच समोरच्या संघावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा तोच आक्रमकपणा निकोलस पूरण पुढे चालू ठेवतो.


आजच्या सामन्यात लखनऊ संघाला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणे अपेक्षित आहे. जर त्यांनी प्रथम फलंदाजी करून २२०-२३० चे आव्हान कोलकत्ता समोर ठेवले तर कदाचित निर्णय लखनऊच्या बाजूने लागू शकतो. धावांचा पाठलाग करताना कोलकत्ताची फलंदाजी कमकुवत पडू शकते कारण आज पर्यंत मागील चार सामन्यात त्यांनी धावांचा पाठलाग करून सामना जिंकलेला नाही.


कोलकत्तासाठी जमेची बाजू म्हणजे आजचा सामना त्यांच्या घरच्या मैदानावर खेळला जात आहे आणि त्यामुळे कोलकत्ता प्रथम गोलंदाजी घेऊन फिरकीच्या जोरावर सामना लवकर गुंडाळण्याचा प्रयत्न करेल.

Comments
Add Comment

पंजाब किंग्सची धुरा श्रेयस अय्यरकडे?

रिकी पाँटिंगच्या अनुपस्थितीत संघ निवडण्याची जबाबदारीही येणार मुंबई  : बीसीसीआय सध्या आयपीएल २०२६ च्या मिनी

दुसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ‘पलटवार’

चंदिगड : मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर गुरुवारी खेळल्या गेलेल्या

श्रीलंका टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

मुंबई : वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघ अखेरीस मोठ्या विश्रांतीनंतर मैदानावर उतरणार आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक

कटकमध्ये भारताचा १०१ धावांनी विजय, दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव

कटक : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी २० मालिकेत भारताने विजयाने शुभारंभ केला. भारताने कटकमध्ये झालेला सामना १०१

भारताचे द. आफ्रिकेसमोर १७६धावांचे लक्ष्य, हार्दिक पांड्याचे धमाकेदार अर्धशतक

कटक (वृत्तसंस्था) : कटकच्या मैदानात सध्या हार्दिक पांड्याच्या बॅटने आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली.

IPL 2026 Players Auction : अंतिम यादी जाहीर; ७७ जागांसाठी ३५० खेळाडूंवर बोली, त्यापैकी २४० भारतीय

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगचा २०२६ चा खेळाडू लिलाव १६ डिसेंबरला अबुधाबी येथे होणार असून, या वेळी एकूण ३५०