Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीMohan Babu : 'कन्नप्पा' चित्रपटाच्या यशासाठी प्रसिद्ध अभिनेते व चित्रपट निर्माते मोहन...

Mohan Babu : ‘कन्नप्पा’ चित्रपटाच्या यशासाठी प्रसिद्ध अभिनेते व चित्रपट निर्माते मोहन बाबू साईचरणी लीन!

शिर्डी : दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता आणि चित्रपट निर्माते डॉ. मोहन बाबू (Mohan Babu) यांनी शिर्डीत (Shirdi Sai Darshan) येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. एक दोन नाही तर तब्बल पाच भाषेत एकाच दिवशी प्रदर्शित होणाऱ्या ‘कन्नप्पा’ या चित्रपटाच्या यशासाठी साई चरणी प्रार्थना केली असल्याचं मोहन बाबू यांनी सांगितले आहे.

BMC : मुंबईतील ३२१ विहिर आणि पाणी भरणा केंद्र रडारवर

अनेक दिवसांपासून प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहात असलेल्या ‘कन्नप्पा या चित्रपटाच्या यशासाठी आज शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आलो असल्याचे सांगत, लवकरच हा चित्रपट ५ भाषेत प्रदर्शित होणार आहे. माझा कुठल्याही नवीन चित्रपट प्रदर्शित होण्याआधी शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येत असतो, साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन नवीन चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना करतो, असे मोहन बाबू यांनी म्हटले.

साईबाबांच्या दर्शनानंतर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी मोहन बाबू यांचा शॉल आणि साईमूर्ती देऊन सत्कार केला. तसेच साईबाबांच्या कृपेनं ‘कन्नप्पा’ हा चित्रपट यशस्वी ठरो आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवो अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

तीन ज्योतिर्लिंगाचेही घेणार दर्शन

‘कन्नप्पा’ या चित्रपटाचा यशासाठी आज साईबाबांच्या चरणी प्रार्थना केली. तसेच हा चित्रपट देव आधी देव महादेव यांचे परमभक्त ‘कन्नप्पा’ यांच्या जीवनकथेवर आधारित असल्याने भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर , घृष्णेश्वर या तिन्ही महादेवाच्या ज्योतिर्लिंग ठिकाणी जाऊन दर्शन घेणार असून या चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना करणार असल्याचही मोहन बाबू यांनी सांगितले.

काय असेल कन्नप्पा चित्रपटाची कथा?

‘कन्नप्पा’ हा चित्रपट मोहन बाबू यांनी निर्मित केला असून मुकेश कुमार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. कन्नप्पा हा एक ऐतिहासिक महाकाव्य आहे ज्यात भगवान शिवाच्या एका महान भक्ताची गोष्ट दाखवण्यात येणार आहे. मोहनलाल, अक्षय कुमार, प्रभास आणि काजल अग्रवाल यांच्या उत्कृष्ट अभिनयासह विष्णू मंचू कन्नप्पाची भूमिका साकारत आहेत. तर प्रीती मुकुंदन देखील मुख्य भूमिका साकरणार आहे. दरम्यान, हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -