नागपूर : एप्रिल महिन्यात शालेय विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा सुरु होते. अशात राज्यातील तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. उन्हाच्या चटक्यांना सामोरे जात विद्यार्थी शाळेत जात आहेत. वाढत्या तापमानाचा पारा लक्षात घेऊन न्यायालयाने शाळांना १५ एप्रिल पूर्वी परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत.
Mumbai Climate : मुंबईत एप्रिलमध्येच मे-जूनची झळ; ठाणे ४० तर मुंबईत उष्णतेचा तडाखा
मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण राज्यात एकाच दिवशी एकाच वेळेस परीक्षा घेण्यासंदर्भात शिक्षण विभागाने या वर्षी निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे शालेय विद्यार्थ्यांची परीक्षा एप्रिल अखेरपर्यंत लांबणार आहे. मात्र राज्यातील तापमानाचा पारा ४४ अंशावर पोहोचला आहे. तापमानाची नोंद लक्षात घेता विदर्भातील शाळांच्या परीक्षा लवकर घेण्याचे आदेश नागपूर खंडपीठाने संबंधित जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यां दिले आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाच्या वरिष्ठांची परवानगी घेऊन वेळापत्रक ठरवावे अशी माहिती दिली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने न्यायालयाच्या निर्देशांचा स्वागत करत विदर्भातील शिक्षण अधिकाऱ्यांनी त्वरित निर्णय करून विदर्भातील शाळांच्या परीक्षेच्या वेळापत्रकात सुधारणा करावी अशी मागणी केली आहे. विदर्भातील तीव्र ऊन आणि वाढलेले तापमान लक्षात घेता १५ एप्रिल पूर्वी विदर्भातील शाळांच्या परीक्षा घेण्यात याव्या अशी मागणी ही महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने केली आहे.