Thursday, July 10, 2025

Japan Helicopter Crash | जपानमध्ये रूग्णांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले; तिघांचा मृत्यू

Japan Helicopter Crash | जपानमध्ये रूग्णांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले; तिघांचा मृत्यू

टोकियो : नैऋत्य जपानमध्ये रूग्णांना घेऊन जाणारे विमान समुद्रात कोसळले. या दुर्घटनेत एका रुग्णासह तिघांचा मृत्यू झाला, तर तिघेजण बचावले आहेत. नागासाकी प्रांतातील विमानतळावरून फुकुओका शहरातील रुग्णालयाकडे हे हेलिकॉप्टर जात असताना ही घटना घडली.




जपान कोस्ट गार्डने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात डॉ. केई अराकावा (३४), रुग्ण मित्सुकी मोटोइशी (८६) आणि काझुयोशी मोटोइशी (६८), यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. बचावासाठी तटरक्षक दलाने दोन विमाने आणि तीन जहाजे या भागात तैनात केली होती.

जपान एअर सेल्फ-डिफेन्स फोर्सच्या हेलिकॉप्टरने केलेल्या शोध मोहिमेत तीनही मृतदेह सापडले. दरम्यान, या अपघातात पायलट हिरोशी हमादा (६६), हेलिकॉप्टर मेकॅनिक काझुतो योशिताके आणि नर्स साकुरा कुनितके (२८) हे तिघेजण बचावले आहेत.

Comments
Add Comment