जळगाव : प्रचंड उन्हाळा, पाण्याची टंचाई आणि मानवी वस्तीशी वाढलेला संपर्क या साऱ्या कारणांनी अमळनेर परिसरात वन्यजीवांना धोका निर्माण झाला आहे. गेल्या चार दिवसांत चार हरणांचा मृत्यू तर, तीन पिल्लं विहिरीत पडल्याची घटना समोर आली आहे.
अमळनेर-टाकरखेडा-जळगाव मार्गावर शासकीय गोदामाजवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन वर्षांच्या हरणाचा जागीच मृत्यू झाला. हृदयद्रावक बाब म्हणजे, अपघातात हरणीचे पोट फाटल्याने तिच्या पोटातील पिल्लू बाहेर आले आणि त्याचाही दुर्दैवी मृत्यू झाला. दोधवद गावात एका आठ महिन्यांच्या काळविटाचा मृतदेह शेतात आढळून आला. तर, जुनोने परिसरात एक तीन महिन्याचे हरणाचे पिल्लू विहिरीत पडले. ही घटना लक्षात येताच चेतन समाधान धनगर आणि दुर्वा आनंदा धनगर या दोघा तरुणांनी धाडस दाखवत विहिरीत उडी घेऊन त्या पिल्लाचे प्राण वाचवले. या घटनेनंतर वनपाल प्रेमराज सोनवणे, वनरक्षक रामदास वेलसे, सुप्रिया देवरे आणि त्यांच्यासोबत वनमजूर व कर्मचारी पथक घटनास्थळी पोहोचले. जखमी हरणांवर पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार करण्यात आले. तर, मृत हरणांचे जंगलात अंत्यसंस्कार करण्यात आले.
कडक उन्हामुळे पाण्याच्या शोधात भटकणाऱ्या हरणांची हालअपेष्टा सुरू झाली आहे. जुनोने परिसरात जंगलात आग लागल्याचा संशय असून त्यामुळे हरणांची धावपळ होऊन पिल्लं विहिरीत पडल्याचे मानले जात आहे. या उन्हाळ्यात वन्यजीवांची विशेष काळजी घ्यावी, विहिरी झाकून ठेवाव्यात आणि वन्यजीव आढळल्यास तत्काळ वनविभागाशी संपर्क साधावा.
मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाचे जवान मुंबईतील अग्निसुरक्षेसाठी सतत प्रयत्नशील असतात. त्याचबरोबर…
मुंबई, (खास प्रतिनिधी) : मुंबईतील वृक्षांच्या संवर्धनासाठी महानगरपालिकेचे 'वृक्ष संजीवनी अभियान २.०' सुरू झाले आहे. मुंबईतील…
मुंबई : उन्हाळ्याच्या सुटीत मुंबईकरांना जलतरणाचे अर्थात पोहण्याचे प्रशिक्षण घेता यावे यासाठी मुंबई महानगरपालिकेने पोहण्याचे…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण षष्ठी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूल, पूर्वाषाढा. योग शिवा, सिद्ध.…
एमएमआरडीए महानगर आयुक्त यांची कोरियन उच्चस्तरीय शिष्टमंडळाने घेतली भेट मुंबई : मुंबई हे जागतिक मानकांनुसार…
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ३४व्या सामन्यात आज पंजाब किंग्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला हरवले…