लोकसंस्कृतीचे विद्यापीठ…

Share

स्नेहधारा – पूनम राणे

ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये कार्यक्रम संपल्यानंतर एक भगिनी आपले डोळे पुसत हातावर पाचशे रुपयांची नोट ठेवत म्हणाली, ‘‘या कार्यक्रमाचे तीनशे रुपये तिकीट काढताना मी आपल्याला मनातल्या मनात फारच उलट सुलट बोलले.” मला आता त्याच खूपच वाईट वाटतंय, पाचशे रुपये सुद्धा खूप कमी पडले असते, इतका छान कार्यक्रम करून मराठी संस्कृती घराघरांत रुजवण्याचा आपण प्रयत्न करत आहात. जी मुले कार्यक्रमांमध्ये सहभागी आहेत त्यांना खाऊ द्या. एका सामान्य भगिनीकडून मिळालेली ही पोहोचपावती होती, सुप्रसिद्ध दिग्दर्शक, पटकथाकार, निवेदक नेपथ्यकार, अभिनेता, निर्माता, आंब्याचे व्यापारी, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, संगीतमय कार्यक्रमाचे निर्माते, लोककला आणि संस्कृती यांचा सुरेख संगम म्हणजे अशोक हांडे.

त्यांचे बालपण उंब्रज या गावी गेले. त्यांचे घराणे वारकरी सांप्रदायाचे होते. त्यामुळे भजन, भारुड, ओव्या यासारख्या लोककलांचा संस्कार त्यांच्या मनावर झाला.

लहानपणी त्यांची आई दळण दळताना जात्यावरील ओव्या म्हणत असे. यावेळेस आईच्या मांडीवर झोपून ते ओव्या ऐकत. त्यांच्या वडिलांनी आंब्याचा व्यवसाय सुरू केला. मुंबईला लालबाग येथील रंगारी बदक चाळ येथे राहायला आले. पहाटेच्या आगमनाची वार्ता देणारा वासुदेव, खंडोबाचा जागर यासारखे वातावरण कलाकारांना मोठे व्यासपीठ देणारे होते. आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम त्यांच्यावर झाला. घरातूनच विविध कार्यक्रमांचा आस्वाद घेता यायचा. दहीहंडी, नवरात्रोत्सव, गणेशोत्सव यावेळी अभिनय स्पर्धा, वकृत्व स्पर्धा यांसारख्या स्पर्धा होत असत. त्यामुळे कला दाखवण्याची संधी प्राप्त होत होती. मिश्र वस्तीची माणसं राहत असल्यामुळे, वेगवेगळ्या पद्धतीचे संवाद कानावर पडत होते. त्यामुळे चाळीतूनच त्यांचे बालपण घडले. याच ठिकाणी आचार्य अत्रे, बाबासाहेब पुरंदरे, प्राध्यापक शिवाजीराव भोसले यांची व्याख्याने त्यांनी ऐकली होती. चाळीमध्ये बेंडखळ्यांकडे एकच रेडिओ होता. संध्याकाळी साडेनऊच्या नंतर चाळीतील सर्वच माणसे रेडिओवरील गाणी ऐकण्यासाठी आतुर झालेली असत. त्यावेळी हा बालक गाणी ऐकताना मन लावून प्रत्येक गाण्याचा अर्थ लक्षात घेत असे. बाल वयातच नाटक, नृत्य करून इतरांचे मनोरंजन करीत असे. शाळा काॅलेजमध्ये पिकनिकच्या ठिकाणी इतरांचं मनोरंजन करणे हा त्यांचा प्रमुख छंद. त्यामुळे पिकनिक स्टार म्हणूनही त्यांचा नावलौकिक होता. हापूस आंब्याच्या रसाळ गोडीसमान वाणी असणारे अशोक हांडे सर हे लंडन वारी करण्यासाठी निघाले, ते म्हणतात, ‘‘लंडन वारी करताना जे विमान लंडनला जायला निघालं, ते विमान यशाच ठरलं… लंडनमध्ये त्यांनी एक कागद घेतला आणि कागदावर जाहिरात लिहिली.

“ तू दूर दूर तेथे, हुरहुर मात्र येथे रसिका, आम्ही आज जरी लंडनला असलो, तरी तुझी आठवण येते.’’
अशा प्रकारच्या अनेक जाहिराती त्यांनी मंगल गाणी दंगल गाणी या कार्यक्रमासाठी लिहिल्या.

मराठी संस्कृतीचा गौरव, मराठी संस्कृतीचा बाणा आणि रसिकांचा सन्मान, हेच त्यांचे प्रमुख उद्दिष्ट होते. सगळ्या कार्यक्रमांचं नेपथ्य म्हणजे श्रीमंतीच कारण पडदा बाजूला जाताक्षणीच टाळ्यांचा पाऊस रसिक श्रोत्यांकडून हमखास पडते आणि हेच त्यांच्या कार्यक्रमांचे खास आकर्षण आहे. मंगलगाणी दंगलगाणीच्या ७२५व्या प्रयोगासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बाबूजी अर्थात सुधीर फडके उपस्थित होते. ते आपल्या भाषणात म्हणाले “ हे एवढे प्रयोग करणे सोपे काम नाही. मी गीत रामायणाचे कार्यक्रम केले. जर आपण असाच कार्यक्रम हिंदीतून केलात तर, आपले नावलौकिक होईल. हा कार्यक्रम भारतभर गाजेल.

मराठी संस्कृती आणि मराठी अस्मिता घराघरांत रुजवण्याचा प्रयत्न करणारे अशोक हांडे सर म्हणजे जणू काही लोक-संस्कृतीचे महान विद्यापीठच आहेत.

Recent Posts

World Book Day : भूतकाळासह भविष्यकाळातील दुवा म्हणजेच ‘पुस्तकं’

मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…

49 minutes ago

‘टीनएजर्सच्या पालकांकडून अपेक्षा’

डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…

1 hour ago

समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे

सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…

1 hour ago

राखी वटवट्या

डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…

1 hour ago

“ठाऊक आहे का तूज काही?”

श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…

2 hours ago

साहित्य म्हणजे नेमकं काय ?

गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…

2 hours ago