मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे येत्या १० एप्रिलपासुन आठ दिवसांच्या अमेरिका दौ-यावर रवाना होत आहेत. रामदास आठवले हे १० ते १७ एप्रिल असा 8 दिवसांचा अमेरिका दौरा करणार आहेत. येत्या १० एप्रिल रोजी ते अमेरिका दौ-यावर रवाना होणार आहेत.
संयुक्त राज्य महासंघ (युनोतर्फे) न्युयॉर्क येथील मुख्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३४ व्या जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या महोत्सवात जगभरातील मान्यंवर उपस्थित राहणार आहेत. युनोतील मुख्यालयात साजरा होणा-या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवास भारतातुन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
अमेरिका दौ-यात रामदास आठवले हे न्युयॉर्क मधील कोलंबिया विश्वविद्यापीठाला भेट देणार आहेत.अमेरिकेतील न्यूयॉर्क आणि अन्य शहरांना ते भेटी देणार आहेत. अमेरिकेतील आंबेडकरी विचारवंत, पत्रकार तसेच अमेरिकेतील अनिवासी भारतीय नागरिक ; उद्योजक ; बौद्ध विचारवंत आणि अभ्यासक यांच्याशी रामदास आठवले संवाद साधणार आहेत.
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…