Friday, October 24, 2025
Happy Diwali

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले १० एप्रिलपासून अमेरिका दौ-यावर

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले १० एप्रिलपासून अमेरिका दौ-यावर

मुंबई :  रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे येत्या १० एप्रिलपासुन आठ दिवसांच्या अमेरिका दौ-यावर रवाना होत आहेत. रामदास आठवले हे १० ते १७ एप्रिल असा 8 दिवसांचा अमेरिका दौरा करणार आहेत. येत्या १० एप्रिल रोजी ते अमेरिका दौ-यावर रवाना होणार आहेत. संयुक्त राज्य महासंघ (युनोतर्फे) न्युयॉर्क येथील मुख्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३४ व्या जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या महोत्सवात जगभरातील मान्यंवर उपस्थित राहणार आहेत. युनोतील मुख्यालयात साजरा होणा-या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवास भारतातुन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

अमेरिका दौ-यात रामदास आठवले हे न्युयॉर्क मधील कोलंबिया विश्वविद्यापीठाला भेट देणार आहेत.अमेरिकेतील न्यूयॉर्क आणि अन्य शहरांना ते भेटी देणार आहेत. अमेरिकेतील आंबेडकरी विचारवंत, पत्रकार तसेच अमेरिकेतील अनिवासी भारतीय नागरिक ; उद्योजक ; बौद्ध विचारवंत आणि अभ्यासक यांच्याशी रामदास आठवले संवाद साधणार आहेत.

Comments
Add Comment