

GOLD : रामनवमीचा योग साधून सोनं खरेदी करणार आहात ? मग जाणून घ्या आजचा सोन्याचा दर
मुंबई : रामनवमीचा योग साधून रविवारी सुटीच्या दिवशी सोनं खरेदीचा विचार करत असलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी. आज मुंबईत २४ कॅरेट शुद्ध सोनं प्रति तोळा (१० ...
परंडा : निरोप समारंभात भाषण करताना विद्यार्थिनीला आली चक्कर; दवाखान्यात नेत असतानाच मृत्यू pic.twitter.com/sr2UxJB2vO
— Dharashiv Live (@dhepesm) April 6, 2025
वर्षा निरोप समारंभात भाषण करत होती. ती भाषणाला उभी राहिली तेव्हा तिला कसला त्रास होत आहे, असे कोणालाही वाटले नव्हते. यामुळे बोलता बोलता ती कोसळली तेव्हा उपस्थित असलेले सर्वजण चक्रावले. डॉक्टरांनी वर्षाचा मृत्यू झाल्याचे सांगितल्यावर उपस्थितांना धक्का बसला.

Pamban Bridge : पंतप्रधान मोदींनी केले भारतातल्या पहिल्या लिफ्ट स्वरुपाच्या सागरी रेल्वे पुलाचे उद्घाटन
रामेश्वरम : पंतप्रधान मोदी श्रीलंका दौऱ्यावरुन भारतात थेट तामीळनाडूत आले आहेत. मोदींच्या हस्ते रामेश्वरम येथे भारतातल्या पहिल्या लिफ्ट स्वरुपाच्या ...
निरोप समारंभाच्या भाषणात वर्षाने शिक्षकांचे आभार मानले. ती महाविद्यालयातील मैत्रिणी आणि शिक्षक यांच्यासंदर्भात बोलत होती. बोलत असताना ती कोसळली.
वर्षा स्टेजवर पडताच उपस्थितांपैकी काही जण स्टेजच्या दिशेने धावले. त्यांनी वर्षाला उठवण्याचा प्रयत्न केला. अनेकांना वाटले की चक्कर आल्यामुळे वर्षा स्टेजवर कोसळली आहे. प्रत्यक्षात भलतेच घडले होते. वर्षाची श्वसन प्रक्रिया थांबल्याची जाणीव होताच तातडीने डॉक्टरांना बोलावण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली आणि वर्षाचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आठव्या वर्षी वर्षाच्या हृदयावर शस्त्रक्रिया झाली होती. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर अखेरचा श्वास घेण्याआधीपर्यंत वर्षाने कधीही छातीत वेदना होत असल्याची तक्रार केली नव्हती. सध्या वर्षा कोणतेही औषध घेत नव्हती. यामुळे अचानक हृदयवाराचा तीव्र झटका कसा आला हा प्रश्न अनेकांना पडला आहे.