Tuesday, April 8, 2025
Homeताज्या घडामोडीMumbai Dabbawala : मुंबईचा डबेवाला चालला सुट्टीवर! नेमके कारण काय?

Mumbai Dabbawala : मुंबईचा डबेवाला चालला सुट्टीवर! नेमके कारण काय?

मुंबई : मुंबईत लाखोंच्या (Mumbai News) संख्येने नोकरदार आहेत. मुंबईतील दोन लाख नोकरदारांना सहा दिवस घरचा डबा बंद राहणार आहे. कारण मुंबईतील डबेवाले (Mumbaicha Dabbawala) आता सहा दिवस सुट्टीवर चालले आहे. पांढरा पोशाख आणि पारंपरिक गांधी टोपी घालणारे मुंबईतील ५ हजार डबेवाला सहा दिवस गावी जाणार आहे. त्यामुळे ९ एप्रिलपासून ६ दिवस मुंबईतील डबेवाल्यांना घरचे जेवण मिळणार नाही. ९ ते १४ एप्रिलपर्यंतच्या ६ दिवसांच्या कालावधीत मुंबईतील बहुतांश डबेवाले आपापल्या गावांतील यात्रांमध्ये सहभागी होणार आहेत. १५ एप्रिलपासून पुन्हा एकदा डबेवाले मुंबईकरांच्या सेवेत हजर होतील.

रामनवमीचा योग साधून सोनं खरेदी करणार आहात ? मग जाणून घ्या आजचा सोन्याचा दर

मुंबईतील नोकरदार वर्ग हा मोठ्या प्रमाणातील डबेवाल्यांच्या सेवांवर अवलंबून आहे. मुंबईत कार्यालयांमध्ये डबे पोहोचवण्याची करामत साध्य करणारे डबेवाले मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर, या तालुक्यातील भागातील गावांमधून येतात. आता त्या गावांमध्ये ग्रामदैवत/ कुलदैवतांच्या यात्रा सुरू झाल्या आहेत. त्यात सहभागी होण्यासाठी मुंबईतील डबेवाले गावी जाणार आहेत. त्यामुळे ९ ते १४ एप्रिलपर्यंत डबे पोहोचवण्याची सेवा डबेवाल्यांनी बंद ठेवली आहे. या सहा दिवसांत रविवारच्या एका सुट्टीचा समावेश आहे. तसेच महावीर जयंती, हनुमान जयंती, बाबासाहेब आंबेडकर जयंती या सुट्ट्याही आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात डबेवाले दोन दिवस सुट्टी घेणार आहे. मंगळवार १५ एप्रिलपासून ही सेवा डबेवाले पुन्हा सुरू करणार आहे.

पूर्वजांची कोडिंग प्रणाली कायम?

उन्हाळी सुट्टीनिमित्ताने बहुतांश शाळा, कॉलेजला सुट्टी लागली आहे. तसेच सरकारी, निमसरकारी कर्मचारी वर्ग उन्हाळी सुट्टीवर गेला आहे. त्यामुळे मुंबईकरांची जास्त अडचण होणार नाही. खासगी अास्थापनांमध्ये काम करणाऱ्यांची अडचण होईल. १८९० पासून मुंबईत डबेवाले सेवा देत आहेत. डब्बेवाल्यांच्या पूर्वजांनी निर्माण केलेली कोडिंग प्रणाली २१ व्या शतकातही प्रचलित आहे. त्यामुळे मुंबईकरांना कोणतीही चूक न होता घरचा डबा मिळत असतो. सुरुवातीला ही साधी कोडिंग होती; परंतु आता मुंबईतील मध्य, पश्चिम आणि हर्बल या ३ लोकल ट्रेन मार्गांसह व्यापक ट्रेन असल्याने कोडिंग अल्फा न्यूमेरिक कॅरेक्टरमध्ये देखील विकसित झाले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -