लातूर : लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी रिव्हॉल्वरमधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आत्महत्येचा प्रयत्न करण्याचे कारण अद्याप समजलेले नाही.
Mumbai Railway News : पश्चिम रेल्वे १५ डब्यांच्या गाड्यांची संख्या वाढवणार
गोळी डोक्यातून आरपार गेली असल्यामुळे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांची प्रकृती गंभीर आहे. सध्या आयुक्तांवर लातूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या निर्देशांनुसार वरिष्ठ पोलीस अधिकारी तपास करत आहेत.
लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांचा आत्महत्येचा प्रयत्न करण्याआधीच्या काही तासांत कोणाकोणाशी संपर्क झाला आणि काय बोलणे झाले हे जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे निराश होऊन टोकाचे पाऊल उचलले हे जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी यापूर्वी जालना, धाराशिव, नांदेड या नगरपरिषद महानगरपालिकांमध्ये अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यांनी लातूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत असताना टोकाचे पाऊल उचलले आहे.