

US Tariff : अमेरिकेच्या टॅरिफ धोरणात भारताला आणखी सवलत मिळणार ?
वॉशिंग्टन : अमेरिकेने भारतातून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर २६ टक्के टॅरिफ अर्थात कर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे करताना अमेरिकेतील ...
सोन्याप्रमाणेच रामनवमीचा योग साधून रविवारी सुटीच्या दिवशी चांदी खरेदीचा विचार करत असलेल्यांची संख्याही मोठी आहे. अशा मंडळींसाठी महत्त्वाची बातमी. आज मुंबईत १० ग्रॅम चांदी ९४० रुपये, १०० ग्रॅम चांदी ९४०० रुपये आणि एक किलो चांदी ९४ हजार रुपये या दराने उपलब्ध आहे.
अमेरिकेने जगातील अनेक देशांसाठी नवे टॅरिफ धोरण लागू केले आहे. या धोरणामुळे अनेकांनी गुंतवणुकीचा सुरक्षित आणि उत्तम पर्याय म्हणून सोनं आणि चांदी यांच्याकडे बघायला सुरुवात केली आहे. यामुळे सोन्याचांदीच्या दरांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. पुढील काही महिन्यांत प्रति तोळा सोनं एक लाख रुपयांच्या घरात जाईल असा अंदाज व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक गुंतवणूक तज्ज्ञ नागरिकांना गुंतवणुकीसाठी सोन्याचांदीचा गांभिर्याने विचार करण्याचा सल्ला देऊ लागले आहेत.