jacqueline fernandez : जॅकलिन फर्नांडिसची आई किम फर्नांडिस यांचे निधन


मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची आई किम फर्नांडिस यांचे रविवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयात निधन झाले. त्यांना २४ मार्च रोजी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर लीलावती रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते.


किम फर्नांडिस या मलेशियन आणि कॅनेडियन वंशाच्या होत्या. त्यांनी १९८० च्या दशकात, बहारीनमध्ये एअर होस्टेस म्हणून काम केले होते. हे काम करत असताना त्यांची ओळख श्रीलंकन बर्गर वंशाच्या एलरॉय फर्नांडिस यांच्याशी झाली, ज्यांनी श्रीलंकेतील यादवी संघर्षामुळे बहरीनमध्ये स्थलांतर केले होते. नंतर किम आणि एलरॉय यांनी लग्न केले. जॅकलिन ही त्यांच्या चार मुलांपैकी सर्वात लहान आहे. जॅकलिनला दोन भाऊ आणि एक बहीण आहे.



आईच्या आजारपणामुळे, जॅकलिनने तिच्या सर्व व्यावसायिक जबाबदाऱ्या बाजूला ठेवून तिच्या शुश्रूषेसाठी वेळ दिला. तिने गुवाहाटी येथे झालेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या उद्घाटन समारंभातील आपले नियोजित सादरीकरण रद्द केले होते.


जॅकलिनने तिच्या आईबद्दल पूर्वीच्या मुलाखतीत सांगितले होते की, "माझी आई नेहमीच माझे समर्थन करत होती. मी तिला खूप मिस करते. मी येथे माझ्या पालकांशिवाय एकटी राहते. ते दोघे खूप मजबूत आहेत आणि माझ्यासाठी प्रेरणास्थान आहेत, जे मला नेहमी पुढे जाण्यास प्रवृत्त करते.


जॅकलिन फर्नांडिसने २००९ मध्ये सुजॉय घोष यांच्या फॅन्टसी अ‍ॅक्शन कॉमेडी अलादीन या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने साजिद खानचा २०१० चा अ‍ॅन्सेम्बल कॉमेडी 'हाऊसफुल', मोहित सुरीचा २०११ चा रोमँटिक थ्रिलर 'मर्डर २', साजिदचा २०१२ चा कॉमेडी 'हाऊसफुल २', अब्बास-मस्तानचा २०१३ चा अ‍ॅक्शन थ्रिलर 'रेस २', साजिद नाडियाडवालाचा २०१४ चा अ‍ॅक्शन कॉमेडी 'किक', साजिद-फरहादचा २०१६ चा कॉमेडी 'हाऊसफुल ३' आणि डेव्हिड धवनचा २०१७ चा कॉमेडी 'जुडवा २' यासारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला सोनू सूद यांच्या दिग्दर्शनात 'फतेह' या चित्रपटात ती शेवटची दिसली होती. लवकरच जॅकलिन तरुण मनसुखानीच्या'हाऊसफुल ५' या कॉमेडी चित्रपटात आणि अहमद खानच्या 'वेलकम टू द जंगल' या अ‍ॅडव्हेंचर कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे.

Comments
Add Comment

अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरने सांगितला 'तो' भयानक किस्सा...

मुंबई : महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून घराघरात पोहचलेली सर्वांची लाडकी अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरला आपण

प्रसिद्ध युट्युबरचा देश सोडून जाण्याचा निर्णय, कारण आले समोर?

मुंबई : युट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी तीनमुळे प्रसिद्धीस आलेला अरमान मलिक कायदेशीर अडचणीत सापडल्यामुळे त्याने देश

बॉलिवूडची ग्लॅम नायिका दीपिकाने अखेर आठ तासांच्या ड्युटीबद्दल सोडले मौन!

मुंबई : बॉलिवूडची आघाडीची नायिका दीपिका पादुकोण मागील अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरली आहे. दीपिका आई

गणिताचे महत्त्व

करिअर : सुरेश वांदिले गणितीय कौशल्यामुळे विविध व्यामिश्र समस्या अधिक साकल्याने समजून घेणे सुलभ जाते. विश्वाची

थिएटर नाही; तर वेंगुर्लेकरांनी नाट्यगृहातच लावले चित्रपटाचे शो!

‘कुर्ला टू वेंगुर्ला’चे सर्व शोज हाऊसफुल्ल माती आणि नाती जोडणारा सिनेमा असे ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे, तो

अभिनेते अजय पूरकर साकारणार खलनायक

नायकाप्रमाणे क्रूर खलनायकही चित्रपटांत गाजलेत! याआधी सकारात्मक भूमिकेत दिसलेले कलाकार आता नकारात्मक पात्र