Tuesday, April 29, 2025
Homeताज्या घडामोडीjacqueline fernandez : जॅकलिन फर्नांडिसची आई किम फर्नांडिस यांचे निधन

jacqueline fernandez : जॅकलिन फर्नांडिसची आई किम फर्नांडिस यांचे निधन

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची आई किम फर्नांडिस यांचे रविवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयात निधन झाले. त्यांना २४ मार्च रोजी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर लीलावती रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते.

किम फर्नांडिस या मलेशियन आणि कॅनेडियन वंशाच्या होत्या. त्यांनी १९८० च्या दशकात, बहारीनमध्ये एअर होस्टेस म्हणून काम केले होते. हे काम करत असताना त्यांची ओळख श्रीलंकन बर्गर वंशाच्या एलरॉय फर्नांडिस यांच्याशी झाली, ज्यांनी श्रीलंकेतील यादवी संघर्षामुळे बहरीनमध्ये स्थलांतर केले होते. नंतर किम आणि एलरॉय यांनी लग्न केले. जॅकलिन ही त्यांच्या चार मुलांपैकी सर्वात लहान आहे. जॅकलिनला दोन भाऊ आणि एक बहीण आहे.

उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वे गाड्या

आईच्या आजारपणामुळे, जॅकलिनने तिच्या सर्व व्यावसायिक जबाबदाऱ्या बाजूला ठेवून तिच्या शुश्रूषेसाठी वेळ दिला. तिने गुवाहाटी येथे झालेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या उद्घाटन समारंभातील आपले नियोजित सादरीकरण रद्द केले होते.

जॅकलिनने तिच्या आईबद्दल पूर्वीच्या मुलाखतीत सांगितले होते की, “माझी आई नेहमीच माझे समर्थन करत होती. मी तिला खूप मिस करते. मी येथे माझ्या पालकांशिवाय एकटी राहते. ते दोघे खूप मजबूत आहेत आणि माझ्यासाठी प्रेरणास्थान आहेत, जे मला नेहमी पुढे जाण्यास प्रवृत्त करते.

जॅकलिन फर्नांडिसने २००९ मध्ये सुजॉय घोष यांच्या फॅन्टसी अ‍ॅक्शन कॉमेडी अलादीन या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने साजिद खानचा २०१० चा अ‍ॅन्सेम्बल कॉमेडी ‘हाऊसफुल’, मोहित सुरीचा २०११ चा रोमँटिक थ्रिलर ‘मर्डर २’, साजिदचा २०१२ चा कॉमेडी ‘हाऊसफुल २’, अब्बास-मस्तानचा २०१३ चा अ‍ॅक्शन थ्रिलर ‘रेस २’, साजिद नाडियाडवालाचा २०१४ चा अ‍ॅक्शन कॉमेडी ‘किक’, साजिद-फरहादचा २०१६ चा कॉमेडी ‘हाऊसफुल ३’ आणि डेव्हिड धवनचा २०१७ चा कॉमेडी ‘जुडवा २’ यासारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला सोनू सूद यांच्या दिग्दर्शनात ‘फतेह’ या चित्रपटात ती शेवटची दिसली होती. लवकरच जॅकलिन तरुण मनसुखानीच्या’हाऊसफुल ५’ या कॉमेडी चित्रपटात आणि अहमद खानच्या ‘वेलकम टू द जंगल’ या अ‍ॅडव्हेंचर कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -