Tuesday, April 29, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वे गाड्या

उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वे गाड्या मुंबई : मध्य रेल्वेने उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन आपल्या नियमित गाड्यांव्यतिरिक्त आजपर्यंत ११५६ उन्हाळी विशेष गाड्यांच्या सेवा जाहीर केल्या आहेत, ज्यामध्ये २८४ अनारक्षित गाड्यांचा समावेश आहे.मध्य रेल्वेने यापूर्वी उन्हाळी विशेष गाड्यांच्या १०५८ सेवांची घोषणा केली होती आणि आता प्रवाशांच्या हितासाठी अतिरिक्त ९८ सेवा चालवणार आहे. रेल्वेने उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मुंबई- मडगाव/कानपूर, पुणे - झांसी आणि कलबुरगि -बेंगळुरू दरम्यान ९८ अतिरिक्त साप्ताहिक उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये मुंबई - सांकराईल दरम्यान ६ अनारक्षित विशेष गाड्यांचा समावेश आहे.

तपशील खालीलप्रमाणे

१.लोकमान्य टिळक टर्मिनस –मडगाव - लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष (१० सेवा) 01103 साप्ताहिक विशेष गाडी ७ एप्रिल ते ५ मे पर्यंत दर सोमवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी ८.२० वाजता सुटतील आणि मडगाव येथे त्याच दिवशी रात्री २१.४० वाजता पोहोचतील. (५ सेवा) 01104 साप्ताहिक विशेष गाडी ६ एप्रिल ते ४ मे पर्यंत दर रविवारी १६.३० वाजता मडगाव येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ०६.२५ वाजता पोहोचेल. (५ सेवा) थांबे : ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि. संरचना : एक वातानुकूलित द्वितीय, तीन वातानुकूलित तृतीय, दोन वातानुकूलित तृतीय इकॉनॉमी, ८ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनररेटर कार.   २. लोकमान्य टिळक टर्मिनस -कानपूर - लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक अतिजलद विशेष (२४ सेवा) 04152 साप्ताहिक अतिजलद विशेष गाडी १२ एप्रिल ते २८ जून पर्यंत दर शनिवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १७.१५ वाजता सुटेल आणि कानपूर येथे दुसऱ्या दिवशी १५.४५ वाजता पोहोचेल. (१२ सेवा) 04151 साप्ताहिक अतिजलद विशेष गाडी ११ एप्रिल ते २७ जून पर्यंत दर शुक्रवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १५.२५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १४.५५ वाजता पोहोचेल. (१२ सेवा) थांबे : इगतपुरी, भुसावळ, इटारसी, जबलपुर, कटनी, सतना, प्रयागराज, भरवारी, सिराथू आणि फतेहपुर संरचना : एक द्वितीय वातानुकूलित , पाच तृतीय वातानुकूलित, ४ शयनयान, ८ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड्स ब्रेक व्हॅन. ३. पुणे- झांसी- पुणे साप्ताहिक अतिजलद विशेष (२४ सेवा) 01921 साप्ताहिक अतिजलद विशेष गाडी दि. १०.०४.२०२५ एप्रिल ते २६ जून पर्यंत दर गुरुवारी १५.१५ वाजता पुणे येथून सुटेल आणि विरांगना लक्ष्मीबाई झाशी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी १०.०० वाजता पोहोचेल. (१२ सेवा) 01922 साप्ताहिक अतिजलद विशेष गाडी ९ एप्रिल ते २५ जून पर्यंत दर बुधवारी विरांगना लक्ष्मीबाई झाशी येथून १२.५० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ११.३५ वाजता पोहोचेल. (१२ सेवा) थांबे : दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, नर्मदापुरम, राणी कमलापती, विदिशा, बीना आणि ललितपुर. संरचना : एक द्वितीय वातानुकूलित , चार तृतीय वातानुकूलित, ६ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड्स ब्रेक व्हॅन ४. हडपसर- झांसी- हडपसर साप्ताहिक अतिजलद विशेष (२६ सेवा) 01923 साप्ताहिक अतिजलद विशेष गाडी ६ एप्रिल ते २९ जून पर्यंत हडपसर येथून दर रविवारी १९.१० वाजता सुटेल आणि विरांगना लक्ष्मीबाई झांसी येथे दुसऱ्या दिवशी १५. वाजता पोहोचेल. (१३ सेवा) 01924 साप्ताहिक अतिजलद विशेष गाडी दि. ५ एप्रिल ते २८ जून पर्यंत दर शनिवारी विरांगना लक्ष्मीबाई झांसी येथून १९.४० वाजता सुटेल आणि हडपसर येथे दुसऱ्या दिवशी १६.३० वाजता पोहोचेल. (१३ सेवा) थांबे : दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, राणी कमलापती आणि बीना संरचना : एक द्वितीय वातानुकूलित, चार तृतीय वातानुकूलित, ६ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड्स ब्रेक व्हॅन   ५. कलबुरगि - सर एम विश्वेश्र्वराय टर्मिनल बेंगलुरू साप्ताहिक विशेष (८ सेवा) 06520 साप्ताहिक विशेष गाडी ६ एप्रिल ते २७ एप्रल पर्यंत दर रविवारी कलबुरगि येथून सकाळी ०९.३५ वाजता सुटेल आणि एसएमव्ही बेंगलुरू येथे त्याच दिवशी रात्री २० वाजता पोहोचेल. (४ सेवा) 06519 साप्ताहिक विशेष गाडी ५ एप्रिल ते २६ एप्रिल पर्यंत दर शनिवारी रात्री २१.१५ वाजता एसएमव्ही बेंगलुरू येथून सुटेल आणि कलबुरगि येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ०७.४० वाजता पोहोचेल. (४ सेवा) थांबे : शहाबाद, यादगिर, कृष्णा, रायचूर, मंत्रालयम रोड, आदोनी, गुंतकल, अनंतपूर, धर्मवरम आणि यलहंका संरचना : एक द्वितीय वातानुकूलित, एक तृतीय, वातानुकूलित, ११ शयनयान, ०४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि ०२ सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन अनारक्षित विशेष ६) भिवंडी रोड- सांकराईल / सांतरागाछि- भिवंडी रोड साप्ताहिक अनारक्षित विशेष (६ सेवा) 01149 साप्ताहिक अनारक्षित विशेष ९ एप्रिल ते २३ एप्रिल पर्यंत दर बुधवारी भिवंडी रोड येथून २२.३० वाजता सुटेल आणि सांकराईल गुड्स टर्मिनल येथे तिसऱ्या दिवशी दुपारी १३ वाजता पोहोचेल. (३ सेवा) 01150 साप्ताहिक अनारक्षित विशेष १२ एप्रिल ते २६ एप्रिल पर्यंत दर शनिवारी रात्री २१ वाजता सांतरागाछि येथून सुटेल आणि भिवंडी रोड येथे तिसऱ्या दिवशी रात्री ११.३० वाजता पोहोचेल. (३ सेवा) थांबे : कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, रायपूर, बिलासपुर, झारसुगुड़ा, राउरकेला, चक्रधरपुर, टाटानगर आणि खड़गपुर संरचना : १० सामान्य द्वितीय श्रेणी, २ द्वितीय श्रेणी-सह- गार्डची ब्रेक व्हॅन आणि १० पार्सल व्हॅन आरक्षण : विशेष शुल्कासह विशेष ट्रेन क्रमांक 06520 साठी बुकिंग सुरू आहे. विशेष शुल्कासह विशेष ट्रेन क्रमांक 01103, 04152, 01921 आणि 01923 साठी बुकिंग ५ एप्रिल रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in संकेतस्थळावर सुरू होईल.अनारक्षित विशेष आणि कोचसाठी तिकिटे सामान्य शुल्कासह यूटीएस ॲपद्वारे बुक करता येतील. या विशेष ट्रेनच्या तपशीलवार वेळा आणि थांब्यांसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.  
Comments
Add Comment