आजकाल पालक आपल्या मुलांच्या जडणघडणीसाठी पालकत्वाच्या विविध पद्धती अवलंबताना दिसतात. त्यातीलच एक आहे ‘डॉल्फिन’ पालकत्व. बरेच पालक या पद्धतीला परफेक्ट पॅरेन्टिंग स्टाईल मानतात. कारण यातून मुलांना योग्य दिशा प्राप्त होते. डॉल्फिन पॅरेन्टिंग हा शब्द सर्वप्रथम ब्रिटिश सायकॅट्रिस्ट डॉक्टर झिमी कांग यांनी वापरला.
डॉल्फिन पॅरेन्टिंग ही पालकत्वाची अशी एक पद्धत आहे जी मुलांना स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण, स्वावलंबी बनवण्यावर लक्ष केंद्रित करते. डॉल्फिन पॅरेंन्टस मुलांकरिता काही सर्वसाधारण नियम बनवतात. पण मुलांमधील सृजनशीलतेलाही ते महत्त्व देतात. या पालकत्व पद्धतीत मुलांच्या आयुष्यात समतोल राखणे हा उद्देश असतो. मुलांना स्वतःहून निर्णय घ्यायला आणि प्रश्नांची सोडवणूक करण्यास या पालकत्व पद्धतीत प्रोत्साहन दिले जाते.
साधारणतः आपण दोन प्रकारच्या पालकत्व पद्धतीचा अवलंब करतो. काही पालक कडक शिस्तीचे (टायगर) असतात तर काही सहज (डॉल्फिन ) पालक असतात.
दोन्ही पालकत्वपद्धती एकमेकांपेक्षा अगदी वेगळ्या आहेत. खरंतर विरुद्ध आहेत. डॉल्फिन पालकत्वात समतोल असतो तर टायगर पालकत्वात मुलांवर फक्त हुकूम चालवला जातो. डॉल्फिन पालकत्वात मुलांनी चुका केल्या तर त्यांना चुका करण्याची संधी दिली जाते. स्वातंत्र्य दिले जाते. याउलट टायगर पालकत्वात मुलांवर पूर्ण नियंत्रण ठेवले जाते.
डॉल्फिन पालकत्वात आईवडिलांची भूमिका महत्त्वाची असते. आयुष्यातील चढउतारांना तोंड देण्यासाठी मजबूत बनवतात.
अभ्यासाबरोबरच एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीत भाग घेण्यासाठी पालक मुलांना प्रोत्साहन देतात. ते आपल्या मुलांवर अभ्यासाबाबत दडपण आणत नाहीत. एखादी चूक झाली तर त्याकरिता कठोर शिक्षा केली जात नाही. डॉल्फिन पालकत्वात मुलांवर सकारात्मक प्रभाव टाकतं. कारण यात मुलांना मोकळेपणाने जगण्याची संधी मिळते. ते आपल्या आजूबाजूचं जग एक्स्प्लोअर करतात.
असे पालक मुलांच्या अभ्यासाबरोबरच त्यांच्या आवडीनिवडींचीही ते काळजी घेतात. आपल्या मुलांशी त्यांचं मजबूत नातं असतं. ते तसं नातं तयार केल्याने मुलं न घाबरता काम करू शकतात. यामुळे मुलं शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सजग राहतात.
डॉल्फिन पालकत्वाचं आणखी एक वैशिष्ट्य की हे पालक मुलांच्या त्या त्या वयातील आपल्या मुलांच्या गरजांनुसार स्वतःला बदलतात. याचा त्यांच्या मुलांच्या मनावर सकारात्मक परिणाम होतो. मुलांशी ते नेहमी गप्पा मारतात. खूप कडक नियम ठरवत नाहीत. जास्त सूचना देत नाहीत. प्रत्येक गोष्टीवरून टोकत नाहीत. यामुळे सामाजिक कौशल्य अधिक प्रभावी होतात.
डॉल्फिन पालकत्वाचा उपयोग करताना काही गोष्टी लक्षात ठेवू या.
अशा काही गोष्टी, नियम ठरवा ज्या गोष्टींचे पालन मुलं कोणत्याही दबावाविना पालन करू शकतील.
अतिस्वातंत्र्य देऊ नये. थोडे लक्ष देणंही आवश्यक आहे. मुलांसमोर अपशब्द, शिव्यांचा वापर करणं घातक ठरतं.
मुलांना स्वव्यवस्थापन आणि स्वनिगेचे महत्त्व समजावून सांगा.
उत्तम पालकत्व हा मुलांच्या भविष्याचा पाया असतो. यासाठी मुलांना समजूतदारपणा, धैर्य, सहानुभूती, विश्वास आणि पूर्ण कुटुंबाचा पाठिंबा पालकांनी द्यायला हवा.
टायगर पालकत्वात पालक मुलांना पूर्णपणे कंट्रोल करतात. या पालकत्वात मुलांना निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले जाते पण पालक लक्ष ठेवून असतात. आपल्या समस्यांवर उत्तर शोधण्यासाठी मुलांना प्रेरित करतात. मात्र आपलं मूल प्रत्येक क्षेत्रात अचूक, परफेक्टच असलं पाहिजे असा या पालकांचा आग्रह असतो.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…