Saturday, October 25, 2025
Happy Diwali

‘सीबीएसई’च्या धर्तीवर इयत्ता पहिलीचा अभ्यासक्रम

‘सीबीएसई’च्या धर्तीवर इयत्ता पहिलीचा अभ्यासक्रम

सोलापूर : शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्याची परंपरा यावर्षीही कायम राखली जाणार आहे. त्यासाठीची तयारी बालभारती व शालेय शिक्षण विभागाने केली आहे. ३१ मे पर्यंत शाळा स्तरावर पुस्तक पुरवण्याचे नियोजनही आखले आहे. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम बदलणार असून तो ‘सीबीएसई’च्या धर्तीवर तयार करण्यात आला आहे. त्यात चित्रांमधून विद्यार्थ्यांना अधिकाधिक माहिती देण्याचा प्रयत्न आहे. मुलांची आवड लक्षात घेऊन अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या सर्व सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी, अनुदानित अशा जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. जिल्ह्यातील मराठी, उर्दू व कन्नड माध्यमांच्या पाठ्यपुस्तकांचा समावेश आहे. त्यासाठी पुण्याच्या बालभारतीकडून पुस्तके मिळणार आहेत.

तालुका व केंद्र स्तरावर उतरवून घेण्याचे व ती शाळांपर्यंत वेळेत पोचवण्याची तयारी शिक्षण विभागाने केली आहे. दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा निर्णय शाळा व्यवस्थापन समिती स्तरावर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश देखील मिळणार आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >