वॉशिंग्टन : अमेरिकेने भारतातून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर २६ टक्के टॅरिफ अर्थात कर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे करताना अमेरिकेतील कारखान्यात तयार होणाऱ्या पक्क्या मालासाठी आवश्यक कच्चा माल म्हणून येणाऱ्या अनेक भारतीय वस्तू तसेच अमेरिकेसाठी महत्त्वाच्या असलेल्या भारतीय वस्तू यांना टॅरिफमधून सवलत देण्यात आली आहे. आता अमेरिका भारताला द्यायच्या सवलतीत आणखी वाढ करण्याचा विचार करत आहे. या मुद्यावर भारत आणि अमेरिकेच्या प्रतिनिधी मंडळांची चर्चा सुरू आहे. सीएनएनच्या वृत्तानुसार भारत, इस्रायल आणि व्हिएतनाम या तीन देशांच्या प्रतिनिधी मंडळांशी अमेरिका चर्चा करत आहे.
लंडनहून मुंबईला येणारे विमान तुर्की विमानतळावर दोन दिवसापासून अडकले; २५० हून अधिक प्रवासी
भारत – अमेरिका यांच्यातील आयात – निर्यात व्यापारात दोन्ही देशांच्या लाभांचा विचार करुन तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. द्विपक्षीय व्यापार कराराची बोलणी यशस्वी झाल्यास भारताला टॅरिफमधून मिळत असलेल्या सवलतीत आणखी वाढ होणार आहे. अमेरिकेने सध्या चीन आणि कॅनडा या देशांसोबत द्विपक्षीय व्यापार कराराबाबत नव्याने चर्चेचा विचार करत नसल्याचे जाहीर केले.
अमेरिकेचे नवे टॅरिफ धोरण जाहीर; मेक्सिको, कॅनडा आणि चीनला फटका तर भारताचे किरकोळ नुकसान
अमेरिकेने जाहीर केलेल्या निर्णयानुसार ते ९ एप्रिल पासून भारतातून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर २६ टक्के टॅरिफ अर्थात कर लागू करार आहेत. व्हिएतनामच्या वस्तूंवर ४६ टक्के आणि इस्रायलच्या वस्तूंवर १६ टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे.