Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडीलंडनहून मुंबईला येणारे विमान तुर्की विमानतळावर दोन दिवसापासून अडकले; २५० हून अधिक...

लंडनहून मुंबईला येणारे विमान तुर्की विमानतळावर दोन दिवसापासून अडकले; २५० हून अधिक प्रवासी

अंकारा : भारतीयांसह २५० हून अधिक व्हर्जिन अटलांटिक विमान कंपनीचे प्रवासी तुर्कीमधील विमानतळावर ४० तासांपेक्षा जास्त काळ अडकून पडले आहेत. लंडनहून मुंबईला येणारे विमान दियारबाकीर विमानतळाच्या दिशेने वळवण्यात आले होते. लंडन हिथ्रो येथून मुंबईला जाणारे विमान परतण्याची शक्यता आहे. व्हर्जिन अटलांटिकने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांना मुंबईला नेण्यासाठी पर्यायी फ्लाइटची व्यवस्था करण्यासह सर्व पर्यायांचा विचार केला जात आहे.

लंडन-मुंबई व्हर्जिन अटलांटिक विमानातील २५० हून अधिक प्रवाशांना दोन दिवसांपासून अडचणींचा सामना करावा लागत आहे. यातील बहुतांश भारतीय आहेत. सर्व प्रवासी तुर्कीतील दियारबाकीर विमानतळावर ४० तासांपेक्षा जास्त काळ अडकून पडले आहेत. २ एप्रिल रोजी लंडनहून मुंबईला जाणारे VS358 हे विमान आपत्कालीन परिस्थितीमुळे दियारबाकीर विमानतळावर उतरवण्यात आले. मात्र, लँडिंग केल्यानंतर विमानात तांत्रिक बिघाड निर्माण झाला. मात्र त्यानंतर प्रवाशांची मुंबईला परतण्याबाबत कोणतीही सुविधा करण्यात आली नव्हती.

Fake Aadhaar Card: AIचा गैरवापर! ChatGPTवर बनवले नकली आधार कार्ड!

विमानातल्या बिघाडानंतर क्रूला हॉटेलमध्ये नेण्यात आले तर प्रवाशांना छोट्या प्रादेशिक विमानतळामधील भागात थांबवण्यात आले. मात्र तिथे पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना दोन दिवसांपासून मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. भारतीय दूतावासाच्या मदतीनंतर काही प्रवाशांना जवळच्या हॉटेलमध्ये नेण्यात आले आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी ९ वाजेपर्यंत परतीच्या प्रवासासाठी दुसरे विमान तयार होईल, असे एअरलाइनने सांगितले होते. मात्र काही प्रवासी अजूनही विमानतळ ट्रान्झिट होल्डिंग एरियामध्ये आहेत.

अडकलेल्या प्रवाशांपैकी एकाने सांगितले की, त्यांना जमिनीवर बसण्यास भाग पाडले गेले. त्यांना ब्लँकेटही देण्यात आले नाही. याशिवाय, शाकाहारी जेवण उपलब्ध नाही, असे एका प्रवाशाने सांगितले. मात्र व्हर्जिन अटलांटिकने सांगितले की, तुर्कीमध्ये प्रवाशांना रात्रीसाठी हॉटेल आणि अन्न आणि पाणी पुरवले जात आहे. २७५ प्रवाशांमध्ये एक शौचालय आहे. त्यांच्याकडे अडॅप्टर नसल्याने फोनची बॅटरी संपत आहे. लहान मुले, गरोदर स्त्रिया, मधुमेहाचे रुग्ण आणि वृद्धांना हा त्रास सहन करावा लागतोय, असेही एका प्रवाशाने सांगितले.

दरम्यान, तुर्कस्तानमधील भारतीय दूतावासाने या घटनेनंतर सक्रिय भूमिका घेतली आहे. भारतीय दूतावासाने एअरलाइन, दियारबाकीर विमानतळ संचालक आणि तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे. दूतावासाने या प्रकरणावर एक निवेदन जारी करुन प्रवाशांची योग्य काळजी घेतली जात असल्याचे सांगितले. ही समस्या सोडवण्यासाठी आणि मुंबईला जाण्यासाठी पर्यायी विमान व्यवस्था करण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांसोबत काम करत आहोत, असेही दूतावासाने म्हटलं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -