नवसर्जनतेची प्रक्रिया : थेट तुमच्या घरातून

Share

भालचंद्र कुबल – पाचवा वेद

नाट्यनिर्मिती ही संमिश्र कला असल्यामुळेच ती व्यापक आणि विविधांगी आहे आणि म्हणूनच नाट्यनिर्मिती आणि सादरीकरणाची प्रक्रिया आज बिकट झाली आहे. हौशी रंगभूमीला घर-घर लागली आहे. कलावंतांची शोधा-शोध, शेवटपर्यंत तालमीत टिकवून ठेवणे जिकिरीचे झाले आहे. ग्रामीण भागातील रंगभूमी काही अपवाद वगळता संपली आहे. आता रंगभूमी उरली आहे ती टीव्ही माध्यमातून स्थलांतरीत झालेल्या रंगकर्मींच्या बळावर सादर होणाऱ्या कलाकृतींवर आणि स्पर्धांपुरती मर्यादित…! स्वतःच्या वैयक्तिक प्रमोशनसाठी नाटक हे लाईव्ह माध्यम आहे, हे ओळखून त्याचा वापर लाॅंगटर्मसाठी न करता स्वीट आणि सुटसुटीत प्रहसनात्मक सादरीकरण करुन सातत्याने प्रेक्षकांच्या “टच” मध्ये राहणे आजमितीला अनिवार्य आहे. हे नव्या पिढीच्या कलाकारांनी ओळखलंय. एखाद्या मराठी क्लासिक्सच्या मागे न लागता, एखादी चटपटीत घटना नाटक माध्यमातून फुलवली गेल्यास प्रेक्षकांनाही ती बघायला, त्याचा भाग बनायला आवडते. एकूणच रंगभूमीसाठी हे फार आशादायक चित्र आहे असे म्हणता येईल का? तर “नवसर्जन” ही एक बदल घडवून आणली जाणारी तात्पुरती, शाॅर्टटर्म प्रक्रिया आहे. आज याच प्रक्रियेचा ऊहापोह एका नाटकाच्या अानुषंगाने करायचे ठरवले आहे आणि ते नाटक म्हणजे “थेट तुमच्या घरातून”

टीव्ही माध्यमातून प्रसिद्धीला आलेले नाॅन फिक्शन कार्यक्रम प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले की तीच लोकप्रियता कॅश करुन घेण्याचा ट्रेंड काही नवा नाही. पुलंच्या व्यक्ती आणि वल्लीपासून काही वर्षांपूर्वी आदेश भावोजींनी आॅन स्टेज पैठण्या वाटपापर्यंत हे फॅड पोहोचलं होतं. आपली लोकप्रियता निरनिराळ्या कार्यक्रमांच्या सुपाऱ्या वाजवून वाढवण्यापेक्षा नाटकरूपी माध्यमातून सादर झाल्यास अधिक सकारात्मक ठरते हे भान मात्र नवसर्जन घडवून आणणाऱ्या नव्या पिढीकडे आहे हे अलीकडे प्रदर्शित झालेल्या विषामृृृत, ठरता ठरता ठरेना, आबा की आयेगी बारात इत्यादी या नाट्यनिर्मितींवरून सिद्ध करता येईल. थेट तुमच्या घरातून आॅलरेडी हिट ठरलेल्या बिग बाॅस सदृृृश कार्यक्रमाची पार्श्वभूमी देण्यात आली आहे. या कार्यक्रमात काय नव्हतं…! रोमँटीसिझम, हेट, संघर्ष, रडारड या कंटेंटमध्ये चिंब भिजलेल्या प्रसंगांची यादीच देता येईल एवढा मसाला दर दिवशी पाहायला मिळायचा. हाच मसाला जर नाट्यरूपाने रंगमंचावर आणला तर? कल्पना अत्यंत व्यावसायिक होती आणि प्रसाद खांडेकरांनी ती कॅश केलीय…! महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या कार्यक्रमातीलच कलाकार घेऊन एक बिग ब्रदर प्लाॅट सादरीकरण म्हणजे “थेट तुमच्या घरातून.”

आपण सारेच दैनंदिन जगण्याच्या धकाधकीत एवढे गुरफटून गेलो आहोत की त्यातील अडचणींवर मात करता करता जगण्यातला आनंद जणू विसरूनच गेलो आहोत. गृहिणी असो वा करिअरसाठी स्ट्रगल करणारी युवा पिढी, घरातल्या कर्त्या पुरुषावरच अवलंबून असते. तो कर्ता झापड लावलेल्या बैलासारखा केवळ राबत राहातो. कौटुंबिक सौख्यासाठी काँम्प्रमाईज करत राहतो. मनःस्ताप झेलंत राहतो. यातूनही एखादी आनंदी झुृृृळूक स्पर्शून गेली तरी समाधानी होतो. बरं ही अवस्था थोड्याफार फरकाने कुटुंबातल्या सर्वांचीच आहे. पण प्रत्येकाने आपापल्या कोषात जगायचे ठरवल्याचा जो विभ्रम दिसून येतो, तोच या नाटकाचा कणा म्हणावा लागेल.

लेखक-दिग्दर्शक आणि कलाकार म्हणून प्रसाद खांडेकरने तिहेरी भूमिका अत्यंत चोख बजावली आहे. मी त्याने विद्यार्थी दशेत केलेल्या एकांकिकांपासून ओळखतो. प्रत्येकवेळी यश मिळेलच अशी खात्री न बाळगता येणारा तो प्लॅटफाॅर्म ते व्यावसायितेत हमखास यश मिळायलाच हवे यासाठी हिट केलेल्या बुल्सआयसाठी प्रसादचं कौतुक करायलाच हवं. मुळात हास्यजत्रेच्या स्किटमध्ये आणि या दोन तास वीस मिनिटांच्या नाटकात मुख्य फरक हाच आहे विनोदाच्या स्टेनेबिलिटीचा. चुटकी सरशी येणारा विनोद आणि टाळी पडणारा विनोद यातील फरक या नाटकामुळे अधोरेखित होतो. आजवर संगीत नाटकातील नाट्यपदांना वन्समोअर म्हणणारा ज्येष्ठ प्रेक्षकवर्ग आज नम्रता संभेरावने केलेल्या एखाद्या मुव्हमेंटला किंवा ओमकार राऊतने गायिलेल्या गझलला वन्समोअर म्हणणारा प्रेक्षकवर्ग तरुण झालाय. मी खरंतर फॅब्रिकेटेड (ओढून ताणून बेतलेल्या) नाटकांवर सहसा लिहीत नाही. कारण सकारात्मक लिहावे असा मुद्दा फॅब्रिकेटेड नाटकांनी केव्हाच मागे सोडलेला असतो.

प्रसंगांची विसंगती, कटेंटचा अभाव आणि फालतू पिजेंवर जो मिळेल तो प्रेक्षकवर्गाला कॅश करुन घेण्याची वृृृत्ती देखील बळावत चालली आहे. परंतु एक सलग स्टोरी लाईन असलेला कंटेंट या नाटकाला जगवेल हे माझे निरीक्षण सांगते. शिवाली परब जेवढी हास्यजत्रेत चुलबुली दिसते तशी मात्र इथे दिसत नाही. तिचा वावर अर्थातच जाणवत राहतो मात्र भक्ती देसाई ज्या प्रमाणात हाॅट दिसलीय किंवा वावरलीय त्याला तोड नाही. शिट्टी ही केवळ भक्तीसाठीच जन्माला आली असावी इतकी ती वाॅव भासते. तिचा लुक हिंदी अथवा इंग्लिश थिएटरचा आहे. शिवाय परफाॅरमन्समध्ये ती कुठेही कमी पडत नाही. नम्रता संभेरावची अनेक रूपं आपण हास्यजत्रेत पाहिली आहेत पण इमोशनल ह्युमरच्या रोलर कोस्टरवर तिने अख्खं नाटक तोलून धरलंय. प्रथमेश शिवलकर आणि शिवाली परब यांचे या नाटकातून रंगमंचावर झालेले पदार्पण अत्यंत आशावादी आहे. ज्या काॅन्फिडन्सने या नाटकाची टिम वावरते तो काॅन्फिडन्स केवळ हौशी रंगभूमीवर स्ट्रगल केलेला कर्ताच देऊ शकतो, असे प्रसाद खांडेकरबाबत म्हणावे लागेल. बाकी नेपथ्य आणि प्रकाश योजनेमुळे नाटक अधोरेखित व्हावे असे संदेश बेंद्रे आणि शाम चव्हाणांना का वाटले नसावे? हा जरा नकारात्मक विचार डोकावून जातो.

नाट्यकलेचा प्रवास कितीही वाटा वळणातून झाला असला तरी सर्जनशीलतेचे आवाहन हजारो वर्षांनंतर आजही कायम आहे. कितीही तांत्रिक प्रगती झाली तरी निर्मिती प्रक्रियेतील सर्जकता अबाधित आहे. ती सर्जकता नव्या पिढीने ज्या पद्धतीने स्वीकारली आहे त्याची संज्ञा किंवा व्याख्या करायला अजूनही काही काळ जावा लागेल परंतू हेच “नवसर्जन” असू शकते.

Recent Posts

RCB vs PBKS, IPL 2025: बंगलोरच्या मैदानावर पंजाब किंग्सचा ‘रॉयल’ विजय

बंगलोर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ३४व्या सामन्यात आज पंजाब किंग्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला हरवले…

6 hours ago

युनेस्कोच्या यादीत भगवद्गीतेचा समावेश

नवी दिल्ली : आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा ठरला आहे. भारताच्या सांस्कृतिक वारशाला…

8 hours ago

हिंदी भाषा सक्ती विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आक्रमक

घाटकोपर मध्ये हिंदी माध्यमातील पाठ्यपुस्तके जाळून मनसेने केला निषेध मुंबई : हिंदी भाषा सक्ती विरोधात…

8 hours ago

गुन्ह्याची माहिती असताना वैभव नाईक यांनी ती का लपवली? आमदार निलेश राणे यांचा सवाल

या प्रकरणात माजी आमदार वैभव नाईक यांचीही चौकशी करा कुडाळ : वैभव नाईक जेव्हा आमदार…

8 hours ago

नवी मुंबईत २८३.७०० किलो प्लास्टिक जप्त

नवी मुंबई : प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांव्दारे एकल वापरातील प्लास्टिकचा वापर थांबविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास…

8 hours ago

हिंदी राष्ट्रभाषा शिकली पाहिजे, चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य

मुंबई : राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात…

9 hours ago