Modi in Sri Lanka : पंतप्रधान मोदींना श्रीलंकेचा सर्वोच्च नागरी सन्मान

  115

कोलंबो : पंतप्रधान नरेंद्र मोदींना श्रीलंकेचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. या पुरस्कारासाठी पंतप्रधान मोदींनी श्रीलंकेचे आभार मानले. हा गौरव फक्त माझा नाही तर १४० कोटी भारतीयांचा आहे, असे या प्रसंगी पंतप्रधान मोदी म्हणाले.



पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात संरक्षण आणि पायाभूत सुविधांसह अनेक करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. याप्रसंगी बोलताना, सबका साथ सबका विकास या दृष्टीकोनातून भारत कार्यरत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. श्रीलंका हा फक्त भौगोलिकदृष्ट्या शेजारी देश नाही तर भारताचा चांगला मित्र देश आहे. याच कारणामुळे श्रीलंकेच्या कठीण काळात भारत ठामपणे श्रीलंकेच्या पाठीशी उभा राहिला आणि यापुढेही श्रीलंकेसोबत असेल, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

राष्ट्रपती दिसानायके यांच्या हस्ते श्रीलंका मित्र विभूषण हा पुरस्कार स्वीकारताना मला आनंद होत आहे. हा पुरस्कार म्हणजे फक्त माझा नाही तर १४० कोटी भारतीयांचा गौरव आहे. ही आमच्यासाठई अभिमानाची बाब आहे; असे पंतप्रधान मोदी यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर सांगितले.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील मैत्रीला ऐतिहासिक बंध आहेत. दोन्ही देशांची मैत्री खूप जुनी आहे. भारतासाठी ही बाब महत्त्वाची आहे की एक शेजारी आणि मित्र म्हणून आम्ही कायम श्रीलंकेच्या पाठीशी आहोत आणि राहणार, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.



कसा आहे श्रीलंकेचा सर्वोच्च नागरी सन्मान ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनी श्रीलंकेचा सर्वोच्च नागरी सन्मान मित्र विभूषण दिला. या पुरस्कारात दोन्ही राष्ट्रांच्या सांस्कृतिक परंपरांना आकार देणाऱ्या सामायिक बौद्ध वारशाला प्रतिबिंबित करणारे धर्मचक्र आहे. पुरस्काराच्या स्वरुपात दिलेल्या पदकात तांदळाच्या पेंढ्यांनी समजवलेला कलश आहे, जो समृद्धी आणि नाविन्याचे प्रतिक आहे. पुरस्कारात असलेली नवरत्ने ही दोन्ही देशांमधील अमूल्य आणि चिरस्थायी मैत्रीचे प्रतिनिधित्व करतात. पुरस्कारात एक आकर्षक कमळ आहे. पदकावर सूर्य आणि चंद्र आहेत. सूर्य आणि चंद्र अनादी काळापासून या विश्वात आहेत. ते कालातीत बंधन दर्शवितात. हे पदक भारत आणि श्रीलंका या दोन देशांतील प्राचीन आणि प्रदीर्घ काळापासून असलेले सांस्कृतिक आणि अध्यात्मिक संबंध सुंदररित्या सादर करते.
Comments
Add Comment

लंडनमध्ये भारतीय रेस्टॉरंटला आग; पाच जण जखमी

लंडन: लंडनमध्ये एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये आग लावल्याची धक्कादायक घटना समोर

स्वातंत्र्यदिनी युक्रेनचा रशियाच्या अण्वस्त्र प्रकल्पावर ड्रोन हल्ला; मोठा स्फोट होऊन आग

मॉस्को: युक्रेनने रशियाच्या ऊर्जा प्रकल्पांवर पुन्हा एकदा मोठा ड्रोन हल्ला केला आहे. युक्रेनच्या स्वातंत्र्य

न्यूयॉर्कमध्ये भारतीयांना घेऊन जात असलेल्या बसला अपघात, पाच ठार

न्यूयॉर्क : अमेरिकेतून एक दुःखद बातमी आली आहे. न्यूयॉर्क राज्य महामार्गावर एका बसचा अपघात झाला. नायगरा

अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांवर धोक्याची टांगती तलवार, नियमांचे उल्लंघन केल्यास रद्द होणार व्हिसा

वॉशिंग्टन: अमेरिकेत स्थायिक झालेले किंवा तिथे व्हिसावर वास्तव्यास असलेल्या ५.५ कोटी परदेशी नागरिकांच्या

दक्षिण अमेरिकेत ८ रिश्टर क्षमतेचा भूकंप

वॉशिंग्टन डीसी : भारतीय वेळेनुसार शुक्रवारी सकाळी सात वाजून ४६ मिनिटांनी दक्षिण अमेरिकेत ८.० रिश्टर क्षमतेच्या

'श्री गणेश करूया...' म्हणत रशियन राजदूताने सुरू केली अमेिरकेवर टीका

भारत संबंधांवर परिणाम होणार नसल्याची रशियाकडून हमी मॉस्को : रशियाकडून भारताला मिळणाऱ्या कच्च्या तेलाची आयात