मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे देखभाल दुरुस्तीसाठी रविवार ६ एप्रिल रोजी मेगाब्लॉक घेणार आहे. मेगाब्लॉक काळात अनेक गाड्या रद्द केल्या जातील अथवा विलंबाने धावतील. प्रवाशांनी या बदलाची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर सकाळी ११ नंतर मेगाब्लॉक आहे. पश्चिम रेल्वेवर रविवारी मध्यरात्री सव्वाबारा ते पहाटे सव्वाचार या वेळेत मेगाब्लॉक असेल. यामुळे दिवसा पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक नसेल.
१८ एप्रिलपासून मुंबई – चिपी विमान सेवा सुरु; खासदार नारायण राणे यांनी दिली माहिती
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान जाणाऱ्या आणि येणाऱ्या धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ०३.५५ या वेळेत मेगाब्लॉक असेल. मेगाब्लॉक काळात माटुंगा ते मुलुंड दरम्यान जाणाऱ्या आणि येणाऱ्या धीम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावर वळवल्या जातील. काही गाड्या रद्द केल्या जातील तर काही गाड्या किमान २० मिनिटे विलंबाने धावतील.
मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी / नेरुळ दरम्यान जाणाऱ्या आणि येणाऱ्या मार्गावर सकाळी ११.१० ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. मेगाब्लॉक काळात ठाणे ते पनवेल/वाशी/नेरुळदरम्यान ट्रान्स-हार्बर मार्गावरील उपनगरीय रेल्वे सेवा बंद राहणार आहे. हार्बर मार्गावर ब्लॉक नसल्यामुळे वाहतूक सुरू राहणार आहे.
मोतीलाल नगरमधील रहिवाशांवर अन्याय होवू देणार नाही – मुख्यमंत्री
पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते राम मंदिर दरम्यान जाणाऱ्या आणि येणाऱ्या जलद मार्गावर रविवारी ६ एप्रिल रोजी मध्यरात्री १२.१५ ते पहाटे ०४.१५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. मेगाब्लॉक काळात बोरिवली ते राम मंदिर दरम्यान जाणाऱ्या आणि येणाऱ्या जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावर वळवल्या जातील. काही गाड्या रद्द केल्या जातील तर काही गाड्या विलंबाने धावतील. दिवसा पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक नसेल.