Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूज१८ एप्रिलपासून मुंबई - चिपी विमान सेवा सुरु; खासदार नारायण राणे यांनी...

१८ एप्रिलपासून मुंबई – चिपी विमान सेवा सुरु; खासदार नारायण राणे यांनी दिली माहिती

सिंधुदुर्ग विमानतळावर मुंबई – पुणे बरोबरच अन्य शहरांसाठी लवकरच विमान सेवा

एअर अलायन्स सेवेबरोबरच इंडिगोचीही विमान उतरणार सिंधुदुर्ग विमानतळावर

नवी दिल्ली : परुळे- चीपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावर येत्या १८ एप्रिल पासून एअर अलायन्सची मुंबई – सिंधुदुर्ग- मुंबई सेवा देणारी विमाने उतरणार आहेत. एअर अलायन्स बरोबरच इंडीगो विमान कंपनीची सेवा सुरू करण्याबाबत युध्द पातळीवर प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी दिली. अलीकडेच नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू यांनी याबाबत विशेष योजना अंमलात आणण्यात येईल असे माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांना आश्वासित केले होते. त्यानुसार गेल्या आठवड्यापासून सिंधुदुर्ग- पुणे विमान वाहतुक सुरुही झाली आहे.

गेले काही महिने चिपी ते मुंबई ही नियमित सुरु असलेली सेवा बंद झाली होती. ही सेवा पुन: मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई अशी सेवा सुरु करण्यासाठी उड्डाण संचालनालयाने विशेष धोरण अंमलात आणावे यासाठी खा. नारायण राणे आग्रही होते. त्यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू तसेच नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेत सिंधुदुर्ग विमानतळावरील सेवा किती महत्वाची आहे, तसेच विमानतळावरील अन्य सेवा, सुविधा, समस्या यांकडे लक्ष वेधले होते.

एमआयडीसी असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा देण्याबाबतचे धोरण करा – मुख्यमंत्री

यानंतर वेगाने कार्यवाही होत सिंधुदुर्ग विमानतळावरील अनेक सेवा- सुविधा अपडेट करण्यात येत आहेत. यामुळे येत्या १८ एप्रील पासून मुंबई-चिपी- मुंबई ही एअर अलायन्सची विमान सेवा दर शुक्रवारी सुरु होणार आहे. याबरोबरच इंडिगो या कंपनीची विमान सेवा मार्ग लवकरच जाहीर केला जाणार आहे.काही त्रांत्रीक त्रृटी दुर केल्यानंतर त्याची माहीती जाहीर होईल. असे खा.नारायण राणे म्हणाले. पुणे- सिंधुदुर्ग – पुणे ही सेवा गेल्याच आठवड्यापासून सुरु झाली आहे.

अलायन्स एअरने मुंबई-सिंधुदुर्गा-मुंबई दरम्यान उड्डाणे सुरू केली. आरसीएस चा कालावधी ३ वर्षांचा होता, जो ऑक्टोबर २०२४ मध्ये संपला. उड्डाण सेवा थांबवल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन आणि अर्थव्यवस्थेवर तसेच एअरलाइन वापरकर्त्यांवर वाईट परिणाम झाला आहे.

मुंबई ते चिपी सेवा कार्यान्वित असताना पर्यटकांना, जिल्हावासीयांना मोठा लाभ होत होता. सणासुदीच्या काळात, हवाई मेळा रु.२५,०००/- पर्यंत वाढायचा. एका मार्गासाठी. कधीकधी अप्रत्याशिततेचा एअरलाइन वापरकर्त्यांवर परिणाम झाला, परंतु फ्लाइट नेहमीच बुक केल्या गेल्या. पर्यटक, स्थानिक प्रवासी आणि जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला मिळणारी उभारी लक्षात घेता सिंधुदुर्गासाठी आरसीएस आणखी पाच वर्षांसाठी वाढवावी, सिंधुदुर्गासाठी अलायन्स एअर सेवा पुन्हा सुरू करावी, अशी भुमिका खा. राणे यांनी स्पष्ट केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -