
मुंबई : गोरेगावच्या मोतीलाल नगरच्या पुनर्विकासात एक आदर्श टाउनशीप तयार केली जाईल. येथील रहिवाशांवर कोणताही अन्याय होवू देणार नाही. सर्वसोयीयुक्त हक्काची घरं प्रत्येकाला मिळणार, अशी हमी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळाला दिली .
गोरेगाव मधील मोतीलाल नगरच्या पुनर्विकासाबाबत हायकोर्टाने निकाल दिला आहे. १४२ एकरवर ‘म्हाडा’ मार्फत हा पुनर्विकास होणार आहे. या विकासात रहिवाशांच्या हक्कांचं रक्षण व्हावं, या प्रकल्पात रहिवाशांना विश्वासात घ्यावं, संपूर्ण पारदर्शकता असावी, या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

पुणे : पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाने संपूर्ण शहरात खळबळ उडवून दिली आहे. प्रसूतीच्या कळा ...
महाविकास आघाडी सरकारने हा ‘विशेष प्रकल्प’ ठरवून त्या अंतर्गत रहिवाशांना १६०० बिल्टअप आकाराची घरे देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र रहिवाशांनी २००० हजार कार्पेट चौरस फुटाची मागणी केली होती. याबाबत रहिवाशांच्या इतर मागण्यांचं निवेदन मा. मुख्यमंत्र्यांना देण्यात आलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात सविस्तर अहवाल तयार करण्याचे आदेश ‘म्हाडा’ला दिले आहेत.
या शिष्टमंडळात युवराज मोहिते यांच्यासह किरण निरभवणे, तरसेमसिंग सोहल, मिलिंद अडांगळे, गौतम कांबळे, अलीम खान, अमीत काकडे, विजय पोवळे आदी रहिवासी सहभागी होते.