Tuesday, July 1, 2025

RJ Mahvash : चहलसोबतच्या डेटिंग बातम्यांवर महवशची प्रतिक्रिया; म्हणाली 'माझा साखरपुडा झाला अन्...'

RJ Mahvash : चहलसोबतच्या डेटिंग बातम्यांवर महवशची प्रतिक्रिया; म्हणाली 'माझा साखरपुडा झाला अन्...'

मुंबई : भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांच्या घटस्फोटामुळे मोठ्या चर्चेत होते. त्यानंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान चहल आणि आरजे महवश यांना सोबत पाहिल्यानंतर त्या दोघांचे सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल झाले. या प्रकरणामुळे नेटकऱ्यांना अनेक प्रश्न पडत असून याबाबत चहलने कसलेही भाष्य न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आरजे महवशने (RJ Mahvash) यावर प्रतिक्रिया दिली आहे.



एका वृत्तवाहिनीसोबत संवाद साधताना आरजे महवशला (RJ Mahvash) तिच्या रिलेशनशिप स्टेटसविषयी प्रश्न विचारले असता तिने मी सिंगल असल्याचे सांगितले. त्याचबरोबर तिला कॅज्युएल रिलेशनशिपवर विश्वास नाही. तिला आता कोणत्याही नात्यात जाणं हे कठीण वाटत असल्यामुळे तिने आता लग्नाचं प्लॅनिंग देखील थांबवलं आहे.


दरम्यान, आरजे महवशने एक धक्कादायक खुलासा केला आहे. ज्यात तिने सांगितले की, १९ वर्षांची असताना तिचा साखरपुडा झाला होता. पण दोन वर्षांत ते नातं संपलं. त्यानंतर तिनं सांगितलं की एका छोट्या शहरातून ती येते. तिथल्या लोकांचे विचार हे फक्त योग्य नवरा आणि लग्न करण्यापर्यंत मर्यादीत आहे. लग्न हेच कोणत्याही महिलेसाठी असलेलं महत्त्वाचं काम आहे, असेही तिने म्हटले. (RJ Mahvash)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >