मुंबई : अनेकांना प्राण्यांविषयी प्रेम नसते त्यामुळे अनेक जण त्यांचा तिरस्कार करतात. मात्र अकोल्यात एका माणसाने प्राण्यांबाबत क्रुरतेचा कळस गाठल्याचे समोर आले आहे. रस्त्यावरील मोकाट कुत्र्यांसह पाळीव कुत्रे अंगावर भुंकतात म्हणून एका व्यक्तीने थेट कुत्र्यांचा जीव घेतल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. (Akola News)
Pune News : पुण्यातील नामांकित रुग्णालयाच्या मुजोरपणामुळे गेला गर्भवतीचा जीव!
मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यातल्या गुडधी भागात मुक्या प्राण्यांसोबत हा प्रकार घडला (Crime) आहे. एका व्यक्तीने मुक्या प्राण्यांना विषारी औषध अन्नात मिसळून ते खायला दिले. यामुळे जवळपास २५ पेक्षा अधिक कुत्र्यांना विषारी अन्न खाल्याने विषबाधा झाली आहे आणि अगदी २४ तासातच या मुक्या प्राण्यांना आपला जीव गमावावा लागला आहे. तर काही जनावरे अजूनही गंभीर स्थितीत आहेत. या प्रकरणाची अकोल्याच्या सिव्हिल लाईन पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर परिसरातून मुक्या श्वानाबाबत हळहळ व्यक्त होत असताना तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच स्थानिक नागरिकांनी संशयित व्यक्तीची सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिले असून भाजपाचे पदाधिकारी आणि संदीप गावंडे यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत अशाप्रकारे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
सीसीटीव्हीत संपूर्ण थरार कैद
गुडधी परिसरात मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी अनेक कुत्र्यांची मृत्युमुखी पडण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने स्थानिकांमध्ये चिंतेचा विषय बनत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता एक व्यक्ती क्षणांना काहीतरी खाण्यासाठी देत आहे आणि त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडत असल्याचे दिसून आलं. या प्रकारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.