Tuesday, July 1, 2025

Pune News : पुण्यातील नामांकित रुग्णालयाच्या मुजोरपणामुळे गेला गर्भवतीचा जीव!

Pune News : पुण्यातील नामांकित रुग्णालयाच्या मुजोरपणामुळे गेला गर्भवतीचा जीव!

पुणे : सांस्कृतिक राजधानी मानले जाणाऱ्या पुणे शहरातील (Pune News) एका नामांकित रुग्णालयाच्या मुजोरपणामुळे गर्भवतीचा जीव गेला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली. महिलेला प्रसूतीच्या कळा सुरू झाल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारासाठी काही पैसे कमी पडत असल्यामुळे रुग्णालयात पुढील उपचार करण्यास नाकारले. यादरम्यान पीडित महिलेला इतर रुग्णालयात नेत असताना तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहरात खळबळ उडाली असून ला जीवापेक्षा पैसा महत्त्वाचा आहे का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.



नेमके प्रकरण काय? 


भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांच्या पत्नी मोनाली उर्फ ईश्वरी ऊर्फ तनिषा भिसे यांना प्रसूती वेदना होत होत्या. सुशांत यांनी पत्नीला पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) नेले. त्यावेळी त्यांच्याकडे १० लाखांची मागणी करण्यात आली. त्यावर अडीच लाख रुपये आता तातडीने भरतो. उपचार सुरू करा, अशी विनंती सुशांत भिसे यांनी केली. पण, रुग्णालयाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. यात गर्भवतीची तब्बेत खालावली आणि जीव गेला. काही मंत्री, आमदार यांनीही रुग्णालय प्रशासनाला फोन केले. परंतु प्रशासन कोणाचं ऐकलं नाही. प्रसूती वेदना वाढल्याने नाईलाजानं सुशांत यांनी वाकड येथील सूर्या हॉस्पिटलमध्ये तनिषा यांना नेण्याचा निर्णय घेतला. मात्र तातडीने अॅम्ब्युलन्सही उपलब्ध झाली नाही. शेवटी खासगी गाडीनेच त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. सूर्या हॉस्पिटलमध्ये त्यांची सिहोरीनद्वारे प्रसुती झाली. तनिषा यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला. मात्र, त्यांची तब्येत ढासळल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयामध्ये हलवण्यास सांगितलं. त्यानुसार जवळच्या मणिपाल रुग्णालयात तनिषा यांना दाखल करण्यात आले. तोपर्यंत त्यांनी आपला जीव गमावला.


या घटनेनंतर भिसे कुटुंबावर एकीकडे जुळ्या लेकींच्या जन्माचा आनंद होत असताना दुसरीकडे मुली जन्मतःच आई गमावल्याच्या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 'जन्मताच दोन नवजात बाळांवर मातृछत्र गमावण्याची वेळ आली नसती' अशा शब्दांत पुण्यात त्या रुग्णालयाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरपणामुळे एका महिलेचा जीव गेल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >