मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील भटक्या कुत्र्यांचे सर्वेक्षण करण्यात आले असून यामध्ये मागील दहा वर्षांमध्ये तब्बल ५ हजारांनी कुत्र्यांची संख्या कमी झाल्याचे दिसून आले आहे. मुंबई महापालिकेने रस्त्यावरील तसेच झोपडपट्टयांमधील भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी त्यांच्या निर्बिजीकरणाची मोहिम हाती घेतली आहे. या निर्बिजीकरणाचा परिणाम दिसून येत असून यामुळे रस्त्यांवरील कुत्र्यांच्या घनतेत २१.०८ टक्के आणि झोपडपट्टयांमधील कुत्र्यांच्या घनतेत २७.४ टक्के घट झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, चार प्रभागात जसे ई विभाग, एन विभाग, आर दक्षिण विभाग आणि टी विभागात कुत्र्यांची घनता १९.९ टक्क्यांनी वाढली आणि प्रभाग डि मध्ये, घनता स्थिर राहिली आहे.
मुंबई महानगरपालिकेने ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल/इंडिया सोबत २०१२-१३ मध्ये मुंबई शहर आणि उपनगरातील भटक्या कुत्र्यांचे बेसलाइन सर्वेक्षण करण्याची मोहिम हाती घेतली. ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल/इंडिया ने मुंबईत बेसलाइन स्ट्रीट डॉग सर्वेक्षण केले, ज्यामध्ये ९५,१७२ कुत्र्यांची लोकसंख्या किंवा अंदाजे १०.५४ कुत्रे प्रति किमी असा अंदाज गृहीत धरला होता. त्यानसार एका दशकानंतर, ट्रेंड आणि अॅनिमल बर्थ कंट्रोल कार्यक्रमांच्या प्रभावाचे मूल्यांकन करण्यासाठी एक फॉलो-अप सर्वेक्षण केले गेले. ज्यात २०२४ च्या सर्वेक्षणात मुंबईमध्ये फिरणाऱ्या कुत्र्यांची संख्या ९०,७५७ एवढी होती. यात मुंबईतील सुमारे ९३०किमी रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते, ज्यात प्रति किमी सुमारे ८.०१ कुत्रे असा होता. जिथे झोपडपट्ट्यांमध्ये २०२४मध्ये प्रति एक किलोमीटर चौरस क्षेत्रामध्ये २२४ कुत्रे आढळले. तिथे मानवी लोकसंख्येतील वाढ असूनही, गेल्या दहा वर्षांत संपूर्ण मुंबई परिसरात रस्त्यावर आणि झोपडपट्ट्यांमध्ये कुत्र्यांच्या घनतेत अनुक्रमे २१.८ टक्के आणि २७.४ टक्के घट झाल्याचे निदर्शनास आल्याचे दिसून आले आहे.
महापालिकेच्या १९ वॉर्डांमध्ये कुत्र्यांची घनता ३१.६ टक्क्यांनी कमी झाली असली तरी काही अपवाद होते. चार प्रभागात जसे ई विभाग, एन विभाग, आर दक्षिण विभाग आणि टी विभागात कुत्र्यांची घनता १९.९ टक्क्यांनी वाढली आणि प्रभाग डि मध्ये, घनता स्थिर राहिली आहे. एकूण नसबंदीचा अर्थात निर्बिजीकरणाचा दर ६२.९ टक्के होता, तर मादी कुत्र्यांचा दर ६१.७ टक्के एवढा कमी होता. स्तनपान करणाऱ्या मादी श्वानांचे प्रमाण ७.१ टक्यांपर्यंत कमी झाला आहे, तरीही पिल्लांची संख्या ४.३ टक्क्यांवर पोहोचली आहे.
सर्वसाधारणपणे ही घट झाली असली तरी, चार वॉर्डामध्ये कुत्र्यांची घनता वाढणे आणि विशेषतः कांदिवली आर दक्षिण विभाग आणि वॉर्ड मुलुंड टी च्या सीमावर्ती वॉर्डामध्ये मुंबईबाहेरून कुत्र्यांचे स्थलांतर किंवा वॉर्डामधील कुत्र्यांचे स्थलांतर किंवा खाद्य यांसारख्या मनुष्याच्या वावर यामुळे पिल्लांचे जगण्याचे प्रमाण वाढून आणि नसबंदीच्या परिणामकारकतेवर परिणाम होऊ शकला. याव्यतिरिक्त, १९९७ मध्ये त्यांच्या पहिल्या नोंदीनंतर, कुत्र्याशी संबंधित तक्रारी आणि त्यांच्याकडून चावा घेण्याच्या घटनांमध्ये सामान्यतः घट झाल्याचे पहायला मिळत आहे,