Tuesday, April 29, 2025

मनोरंजनताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Sagar Karande : या नावाचा मी एकटाच नाही! फसवणुकीच्या प्रकरणावर सागर कारंडेची सारवासारव

Sagar Karande : या नावाचा मी एकटाच नाही! फसवणुकीच्या प्रकरणावर सागर कारंडेची सारवासारव

मुंबई : 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येकाला खळखळून हसवणारा, मराठी माणसांच्या घराघरात पोहचलेला हास्यकलाकार, लेखक व अभिनेता सागर कारंडेची (Sagar Karande) फसवणूक झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. १५० रुपये मिळण्याच्या नादात या अभिनेत्याची तब्बल ६१.८३ लाखांची फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. या घटनेमुळे अभिनेत्यावर घरबसल्या पैसे कमावणे महागात पडल्याचे आरोप होत असताना यावर सागर कारंडे याने फेटाळले असून त्याची प्रतिक्रिया समोर आली. (Sagar Karande Cheated)

नेमके प्रकरण काय?

फेब्रुवारी २०२५ मध्ये एका अनोळखी महिलेनं सागरला एक व्हॉट्सअ‍ॅप मेसेज केला. व्हॉट्सअ‍ॅपवरून सागर कारंडे आणि तिच्यात बोलणं झालं. त्यावेळी महिलेनं त्याला एक स्किम सांगितली. तिनं इन्स्टाग्रामवरील काही पोस्ट 'लाईक' करण्याचं काम देऊ केलं आणि प्रत्येक लाईकसाठी १५० रुपये मिळतील, असं सांगितलं आहे. दिवसाला साधारण ६ हजार रुपये कमावता येतील, असेही तिने नमूद केले. यावर सागर कारंडेने होकार दिल्यानंतर सागरचा विश्वास संपादन करण्यासाठी या भामट्यांकडून त्याला ११ हजार रुपये देण्यात आले आणि त्यामुळे त्याने हे काम सुरू ठेवले. हळूहळू त्याला यामध्ये अधिक गुंतवणूक करण्यात भाग पाडले गेले. सागरने सुरुवातीला २७ लाख भरले आणि त्याचे काम सुरू ठेवले. त्यानंतर त्याने वॉलेटमधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला, पण त्याला असे सांगण्यात आले की काम पूर्ण झाल्यानंतरच पैसे काढता येतील.

त्यानंतर, सागरला पुढे असे सांगण्यात आले की, त्याचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे आणि पैसे काढण्यासाठी १०० टक्के रक्कम भरावी लागेल. त्यानुसार त्याने १९ लाख रुपये आणि ३० टक्के कर भरला. एकूण त्याच्याकडून ६१ लाखांहून अधिक रक्कम या भामट्यांनी उकळली. मात्र घरबसल्या पैसे कमावण्याच्या आमिषाने त्याच्या हाती काहीच लागले नाही. उलट त्याने भरलेला कर चुकीच्या खात्यात गेल्याचे सांगून अधिक पैसे मागितले जात होते. सोशल मीडियावर पोस्ट लाइक करण्यासाठी त्याच्याकडून ६१ लाखांहून अधिक रक्कम उकळण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी सायबर पोलिसांमध्ये (उत्तर विभाग) ३ अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Sagar Karande Cheated)

काय म्हणाला सागर कारंडे?

मराठमोळा अभिनेता सागर कारंडे बोलताना म्हणाला की, "मला त्या प्रकरणावर बोलायचं नाही, फेक आहे ते... त्याबद्दल नाही बोलायचं मला." तसेच, याप्रकरणावर गुन्हा दाखल झाला आहे, असं विचारल्यावर सागर थोडासा वैतागूनच बोलला की, असू देत ना मग... सागर कारंडे एकच नाहीये खूप आहेत. तुम्ही गुगलवर सर्च केलं, तर खूप दिसतील तुम्हाला. जाऊ देत ना त्यांचं काम आहे, ते करतात. मरू देत ना... आपण कशाला लक्ष द्यायचं, प्रकरण खोटं आहे, माझ्यासोबत असं काही झालेलं नाही." (Sagar Karande Cheated of Rs 61 Lakh)

Comments
Add Comment