Waqf Bill : वक्फ विधेयकाला काँग्रेस सुप्रीम कोर्टात आव्हान देणार

जयराम रमेश यांची पत्रकार परिषदेत माहिती


नवी दिल्ली : मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड आणि द्रविड मुणेद्र कडघम (डीएमके) यांच्या मांदियाळीत आता काँग्रेसही जावून बसली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात बहुमताने मंजुर झालेल्या वक्फ दुरुस्ती विधेयकाला (Waqf Bill) सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी काँग्रेसने चालवली असून काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विटरवर (एक्स) संदेश जारी करत याबाबत सुतोवाच केले आहे.





यापूर्वी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि डीएमकेचे प्रमुख एम.के. स्टॅलिन यांनी वक्फ विधेयकाबाबत न्यायालयात जाण्याची घोषणा केली होती. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने २ एप्रिल रोजी विधेयकाच्या विरोधात आंदोलन करण्याच्या आणि कोर्टात जाण्याचा इशारा दिला होता. तर द्रमुक नेते स्टॅलिन यांनी गुरुवारी सांगितले होते की, त्यांचा पक्ष या विधेयकाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करेल.



लोकसभेत विधेयक मंजूर झाल्याच्या निषेधार्थ स्टॅलिन काळी पट्टी घालून विधानसभेत पोहोचले. भारतातील मोठ्या संख्येने पक्षांच्या विरोधाला न जुमानता काही मित्रपक्षांच्या आदेशानुसार रात्री २ वाजता घटनादुरुस्ती स्वीकारणे हा संविधानाच्या रचनेवर हल्ला आहे. यापार्श्वभूमीवर सोशल मिडीयात केलेल्या पोस्टमध्ये जयराम रमेश म्हणाले की, काँग्रेस लवकरच वक्फ (दुरुस्ती) विधेयक, २०२४ च्या घटनात्मक वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देईल. आम्हाला पूर्ण विश्वास आहे. भारतीय संविधानात नमूद केलेल्या तत्त्वांवर, तरतुदींवर आणि पद्धतींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून होणाऱ्या सर्व हल्ल्यांना आम्ही विरोध करत राहू असे जयराम रमेश यांनी सांगितले.


काँग्रेसने यापूर्वी सीएएला कायद्याला आव्हान दिले असून त्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. तसेच माहिती अधिकार कायद्यातील २०१९ च्या सुधारणांना काँग्रेसने आव्हान दिले आहे. निवडणूक आचार नियमातील (२०२४) सुधारणांच्या वैधतेला काँग्रेसने आव्हान दिले आहे यावरही सुनावणी सुरू आहे. त्याचप्रमाणे, १९९१ च्या (प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट) प्रार्थनास्थळ कायद्याची मूळ भावना राखण्यासाठी काँग्रेसने केलेल्या हस्तक्षेपावर सर्वोच्च न्यायालयात एक खटला प्रलंबित आहे.

Comments
Add Comment

'ATAGS' artillery gun is ready : १५ सेकंदात ३ हल्ले आणि ४८ किमीचा अचूक पल्ला; चीन-अमेरिकाही चकित

नवी दिल्ली: रणांगणावर भारताच्या सं

Delhi-Pune SpiceJet Flight : दिल्ली - पुणे विमानात तांत्रिक बिघाड; प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!

नवी दिल्ली : दिल्लीहून पुण्याकडे येणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात उड्डाणापूर्वी तांत्रिक बिघाड झाल्याची घटना

Actor Prakash Raj : अभिनेते प्रकाश राज यांचा SIR वरचा दावा खोटा? निवडणूक आयोगाने दाखवला BLOचा व्हिडिओ; म्हणाले "जुन्या पत्त्यावर..."

नवी दिल्ली : अभिनेता प्रकाश राज (Actor Prakash Raj) आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असतात. आता कर्नाटकमधील Special Intensive Revision (SIR)

Jharkhand : पोलिसांच्या दडपशाहीविरोधात झारखंड बंद

रांची : झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या

Arunachal Pradesh : "अरुणाचल हा भारताचा अविभाज्य भाग", चीनच्या आक्षेपाला भारताचे चोख प्रत्युत्तर

नवी दिल्ली : भारताने गेल्या आठवड्यात आपल्या अधिकृत नकाशावर अरुणाचल प्रदेशातील २७ ठिकाणे आणि भौगोलिक

Vande Mataram Law : ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीने ऐतिहासिक विधेयकाचे कायद्यात रूपांतर

नवी दिल्ली: राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’चा अवमान करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी