Friday, July 11, 2025

Solapur Update : सोलापूर हादरले !

Solapur Update : सोलापूर हादरले !

सोलापूर : सोलापुरातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे भूकंपाचे केंद्रबिंदू असल्याची माहिती मिळाली आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.





मिळालेल्या माहितीनुसार, आज (दि ३ ) सकाळी ११ वाजून २२ मिनिटांनी सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. पंढरपूर, सांगोला आणि मंगळवेढा येथे २.६ रिश्टरस्केल तीव्रतेचे धक्के जाणवले आहेत. दरम्यान या धक्क्यामुळे कोणत्याही पद्धतीची हानी झालेली नाही.

Comments
Add Comment