चैत्री यात्रेनिमित्त प्रशासनाचा निर्णय
सोलापूर : पंढरपूरची चैत्री यात्रा (Pandharpur News) ही महाराष्ट्रातील एक महत्त्वाची धार्मिक यात्रा आहे. ही यात्रा चैत्र शुद्ध एकादशी (चैत्र महिन्यातील शुद्ध एकादशी) दिवशी पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते. चैत्र महिना हा हिंदू पंचांगानुसार नववर्षाचा प्रारंभ दर्शवतो, त्यामुळे या महिन्यातील एकादशीचा विशेष महिमा आहे. पंढरपूरची चैत्री यात्रा (Pandharpur Chaitri Yatra) ही भक्तीचा एक पवित्र सोहळा असून, महाराष्ट्राच्या संतपरंपरेचे दर्शन घडवणारी यात्रा आहे. भक्तगण टाळ-मृदंगाच्या गजरात विठोबाच्या चरणी लीन होऊन अध्यात्मिक शांतीचा अनुभव घेतात. दरम्यान, या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर मालकीण झाली बरं का! खरेदी केली मुंबई फ्रँचायझी
पंढरपुरात येत्या ८ एप्रिल रोजी चैत्री यात्रा भरणार आहे.या यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात मांस आणि मटण विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. ७ ते ९ एप्रिल दरम्यान ही बंदी असणार आहे. चैत्री यात्रेच्या निमित्ताने हा निर्णय घेण्यात आला आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात मांस आणि मटण विक्री करण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. याशिवाय मंदिर परिसरात नारळ विक्री आणि फोडण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे.
पंढरपुरातील उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी यात्रेच्या निमित्ताने हे आदेश काढले आहेत. सध्या प्रशासनाकडून चैत्री यात्रेची पंढरपुरात तयारी सुरू झाली आहे. तसेच चैत्री यात्रेनिमित्त पंढरपुरात विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.