मुंबई : गुढी पाडव्यानिमित्त शिवाजी पार्क येथे घेतलेल्या सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठी भाषेचा मुद्दा मांडला. महाराष्ट्रात मराठीत बोललंच पाहिजे अशी आग्रही मागणी त्यांनी केली. कार्यकर्त्यांना आदेश दिला की, महाराष्ट्रातील प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही हे तपासा. कार्यकर्ते या आदेशानंतर लगेच सक्रीय झाले.
लोणावळ्यामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठी भाषेत बोलत नाही म्हणून बँक ऑफ महाराष्ट्रच्या मॅनेजरला थोबाडीत मारली होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला. आता या घटनेवरुन वकील गुणरत्न सदावर्ते आणि मनसे आमनेसामने असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी बँकेत केलेल्या राड्यावरुन सदावर्ते यांनी मनसेवर कडाडून टीका केली. ज ठाकरे हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत. त्यांची टोळकी बँकांमध्ये धुडगूस घालत आहेत. हा प्रकार थांबला पाहिजे. याबाबत मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक आणि संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार अर्ज देणार असल्याचे सदावर्ते यांनी सांगितले. कायदा हाती घेणाऱ्या टोळक्यांविरोधात कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सदावर्तेंनी केली आहे.
राजकारण म्हटले की आरोप प्रत्यारोप, शह काटशह हे आलेच. जो राजकारणात प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहभागी होणार त्याला त्याच्या चांगल्या वाईट परिणामांना सामोरे जावेच लागेल. पण राजकारणासाठी कायदा हाती घेणे योग्य नाही. कायद्याच्या चौकटीत राहून राजकारण करावे; असे वकील गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
मुंबई : उन्हाळ्याच्या सुटीत मुंबईकरांना जलतरणाचे अर्थात पोहण्याचे प्रशिक्षण घेता यावे यासाठी मुंबई महानगरपालिकेने पोहण्याचे…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण षष्ठी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूल, पूर्वाषाढा. योग शिवा, सिद्ध.…
एमएमआरडीए महानगर आयुक्त यांची कोरियन उच्चस्तरीय शिष्टमंडळाने घेतली भेट मुंबई : मुंबई हे जागतिक मानकांनुसार…
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ३४व्या सामन्यात आज पंजाब किंग्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला हरवले…
नवी दिल्ली : आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा ठरला आहे. भारताच्या सांस्कृतिक वारशाला…
घाटकोपर मध्ये हिंदी माध्यमातील पाठ्यपुस्तके जाळून मनसेने केला निषेध मुंबई : हिंदी भाषा सक्ती विरोधात…