Sunday, October 26, 2025
Happy Diwali

बँकेत मनसैनिकांनी केला राडा, सदावर्ते - राज ठाकरे आमनेसामने

बँकेत मनसैनिकांनी केला राडा, सदावर्ते - राज ठाकरे आमनेसामने
मुंबई : गुढी पाडव्यानिमित्त शिवाजी पार्क येथे घेतलेल्या सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठी भाषेचा मुद्दा मांडला. महाराष्ट्रात मराठीत बोललंच पाहिजे अशी आग्रही मागणी त्यांनी केली. कार्यकर्त्यांना आदेश दिला की, महाराष्ट्रातील प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही हे तपासा. कार्यकर्ते या आदेशानंतर लगेच सक्रीय झाले.
लोणावळ्यामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठी भाषेत बोलत नाही म्हणून बँक ऑफ महाराष्ट्रच्या मॅनेजरला थोबाडीत मारली होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला. आता या घटनेवरुन वकील गुणरत्न सदावर्ते आणि मनसे आमनेसामने असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी बँकेत केलेल्या राड्यावरुन सदावर्ते यांनी मनसेवर कडाडून टीका केली. ज ठाकरे हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत. त्यांची टोळकी बँकांमध्ये धुडगूस घालत आहेत. हा प्रकार थांबला पाहिजे. याबाबत मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक आणि संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार अर्ज देणार असल्याचे सदावर्ते यांनी सांगितले. कायदा हाती घेणाऱ्या टोळक्यांविरोधात कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सदावर्तेंनी केली आहे. राजकारण म्हटले की आरोप प्रत्यारोप, शह काटशह हे आलेच. जो राजकारणात प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहभागी होणार त्याला त्याच्या चांगल्या वाईट परिणामांना सामोरे जावेच लागेल. पण राजकारणासाठी कायदा हाती घेणे योग्य नाही. कायद्याच्या चौकटीत राहून राजकारण करावे; असे वकील गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
Comments
Add Comment