पुँछ : पाकिस्तानने पुँछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी परिसरात नियंत्रण रेषा ओलांडून घुसखोरीचा प्रयत्न केला. पण भारतीय सैनिकांनी हा प्रयत्न हाणून पाडला.
पाकिस्तानमधून घुसखोरीचा प्रयत्न करत असलेल्यांपैकी एकाचा पाय पडल्यामुळे भूसुरुंगाचा स्फोट झाला. यानंतर भारताच्या सैनिकांनी घुसखोरांवर तसेच त्यांची मदत करत असलेल्या पाकिस्तानच्या सैनिकांवर तुफान गोळीबार केला. भारताकडून जोरदार प्रत्युत्तर मिळाले आणि पाकिस्तानने एकदम माघार घेतली.
Fawad Khan : पाकिस्तानी अभिनेता फवाद खान पुन्हा हिंदी सिनेमात दिसणार, मनसेचा संताप
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नियंत्रण रेषेजवळ चार ते पाच घुसखोर आणि तेवढेच पाकिस्तानचे सैनिक ठार झाले. पाकिस्तानचे किमान दोन ते तीन सैनिक भारताच्या गोळीबारात जखमी झाले. भारतीय सैन्याची जीवितहानी झालेली नाही. पाकिस्तानने माघार घेतली तरी नियंत्रण रेषेवर अधूनमधून दोन्ही बाजूने गोळीबार सुरू होता. सध्या कृष्णा घाटी परिसरात भारतीय सैनिक हाय अलर्टवर आहेत.
कथुआ खोऱ्यात काही अतिरेक्यांनी स्थानिकांच्या मदतीने घुसखोरी केली आहे. या अतिरेक्यांच्या विरोधात घनदाट जंगलात भारतीय सैन्याची विशेष मोहीम सुरू आहे. अतिरेक्यांना मदत करणाऱ्यांना शोधून त्यांच्या विरोधातही कारवाई सुरू आहे. भारतीय सैन्याने घनदाट जंगलात लपलेल्या अतिरेक्यांना शोधण्यासाठी आधुनिक टेहळणी उपकरणांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.