विद्यानगरी मेट्रो स्थानकातील ‘बी १’ मध्ये नो एंट्री

७ एप्रिलपर्यंत प्रवेशद्वार बंद ठेवण्याचा एमएमआरसीचा निर्णय


मुंबई : ‘कुलाबा–वांद्रे–सीप्झ मेट्रो ३’मार्गिकेतील आरे–बीकेसी टप्प्यातील विद्यानगरी मेट्रो स्थानकातील ‘बी १’ प्रवेशद्वार तांत्रिक कारणासाठी मंगळवारपासून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. १ ते ७ एप्रिलपर्यंत हे प्रवेशद्वार बंद राहणार असून ८ एप्रिलपासून हे प्रवेशद्वार पुन्हा प्रवाशांसाठी खुले करण्यात येणार आहे. या कालावधीदरम्यान पर्यायी प्रवेशद्वाराचा वापर करण्याचे आवाहन एमएमआरसीकडून करण्यात आले आहे.



एमएमआरसीकडून ३३.५ किमी लांबीच्या ‘मेट्रो ३’ मार्गिकेतील आरे-ते बीकेसी टप्पा ऑक्टोबर २०२४ पासून सेवेत दाखल झाला. ही मार्गिका खुली होऊन काही महिने होत नाही तोच एमएमआरसीने देखभालीची कामे हाती घेतली आहेत. देखभालीच्या कामासाठी विद्यानगर मेट्रो स्थानकावरील ‘बी १’ प्रवेशद्वार मंगळवार, १ एप्रिल रोजी सकाळपासून बंद करण्यात आले.


एमएमआरसीने ‘एक्स’ समाज माध्यमावर दिलेल्या माहितीनुसार विद्यानगरी मेट्रो स्थानकावरील ‘बी १’ प्रवेशद्वार १ ते ७ एप्रिल या कालावधीत बंद राहणार आहे. त्यामुळे आठवडाभर ‘बी १’ प्रवेशद्वार बंद असणार असून प्रवाशांची गैरसोय होणार आहे. दरम्यान, आरे–बीकेसी मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होऊन काही दिवस होत नाही तोच एमएमआरसीने प्रवेशद्वार बंद केले आहे वा सेवा वेळेत कपात करण्यात येत असल्याचे म्हणत प्रवाशांकडून याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

एमपीसीबीचा ओसाखा सिटी प्रशासनासोबत सामंजस्य करार

मुंबई : पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण नियंत्रणासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) जपानच्या

लोकमान्य टिळक मंडईतील विक्रेत्यांवर कारवाई

नूतनीकरणावरून वाद तीव्र मुंबई : लोकमान्य टिळक मंडईमध्ये कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता वाढीव बांधकामावर

टोल थकबाकीमुळे वाहन सेवा थांबणार

एनओसी, फिटनेस प्रमाणपत्र व नॅशनल परमिटवर बंदी मुंबई : राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी

गुन्ह्यांच्या रेकॉर्डमुळे तुमचे करिअर उद्ध्वस्त झाले

सत्र न्यायालयाचा एमएसडब्ल्यूच्या विद्यार्थ्यांना गंभीर इशारा मुंबई : मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल

प्रशासनालाच पडला पालिका सभागृहाच्या निर्णयाचा विसर

नगरसेवकांची हजेरी बायामेट्रिक पद्धतीने सचिन धानजी मुंबई : मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांची पुस्तिकेवरील

प्रजासत्ताक दिनी राज्यपाल मुंबईत; उपमुख्यमंत्री शिंदे ठाण्यात ध्वजवंदन करणार!

मुख्यमंत्री फडणवीस दादरमध्ये, अजित पवार पुण्यात हजेरी लावणार मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री