IPL 2025: जोस बटलर आणि साई सुदर्शनच्या झंझावातासमोर बंगळुरूची शरणागती, गुजरातने ८ विकेट राखत जिंकला सामना

बंगळुरू: आयपीएल २०२५मध्ये आज घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना गुजरात टायटन्स संघाने ८ विकेट राखत हरवले. आरसीबीने पहिल्यांदा फलंदाजी करताना ८ बाद १६९ धावा केल्या होत्या. मात्र गुजरात टायटन्सने हे आव्हान ८ विकेट राखत पूर्ण केले.


१७० धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या गुजरातची सुरूवात शानदार राहिली. गिल आणि साई सुदर्शन यांनी ठोस सुरूवात करून दिली. दरम्यान, गिल १४ धावा करून बाद झाला. मात्र यानंतर साई सुदर्शन आणि जोस बटलर यांनी मोर्चा सांभाळला. साई सुदर्शन ४९ धावा करून बाद झाला. यानंतर बटलरने शानदार गोलंदाजी केली. त्याने नाबाद ७३ धावा ठोकल्या. यासोबतच १८व्या षटकांतच त्यांनी हा सामना जिंकला.


तत्पूर्वी, पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या आरसीबीची सुरूवात खराब राहिली. दुसऱ्याच ओव्हरमध्ये आरसीबीला विराट कोहलीच्या रूपात पहिला झटका बसला. कोहली केवळ ७ धावा करून बाद झाला. यानंतर तिसऱ्याच षटकांत देवदत्त पड्डिकलला सिराजने बोल्ड केले. ५व्या षटकांत फिल सॉल्टलाही सिराजने बाद केले. ७व्या षटकांत कर्णधार रजत पाटीदारला इशांतने बाद केले.


यानंतर जितेश शर्माने मोर्चा सांभाळला. त्याने ३३ धावांची खेळी केली. मात्र तो १३व्या षटकांत बाद झाला. मात्र यानंतर लिव्हिंगस्टोनने तुफानी खेळी केली. त्याने अर्धशतक ठोकले. तर टीम डेविडनेही शानदार फलंदाजी केली. याच्या जोरावर आरसीबीने २० षटकांत ८ बाद १७० धावा केल्या.

Comments
Add Comment

क्रिकेटच्या 'थाला'ला हाऊसिंग बोर्डाची नोटीस; केवळ १५ दिवसांची मुदत

क्रिकेटचा थाला अशी ओळख असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला झारखंड राज्य गृहनिर्माण

वेस्ट इंडिज-भारताच्या सामन्याचा पावसावर ठरणार निकाल

रन रेटवर ठरणार उपांत्य फेरीचा दावेदार नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर ८ फेरीचे सामने अंतिम टप्प्यात असून

अर्शदीपने मोडला बोल्टचा विक्रम

बुमराहलाही टाकले मागे नवी दिल्ली : भारतीय संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने टी-२० विश्वचषकात आपल्या

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात फटकेबाजी करत इंग्लंडने मारली बाजी

कोलंबो : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतीली इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना

IPL 2026 : आयपीएल कधी सुरू होणार ? हाती आली महत्त्वाची माहिती

मुंबई : मिनी ऑक्शन झाला त्यावेळी आयपीएल २०२६ ही स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून सुरू होईल असे सूतोवाच बीसीसीआयने केले

मुंबईत कबड्डी स्पर्धांसाठी मैदाने होणार अल्प दरात उपलब्ध

महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ असून कबड्डीची पंढरी म्हणून