अखेर आपली चिकित्सा योजनेची लवकरच पुन्हा अंमलबजावणी

पाच संस्थांनी दाखवले स्वारस्य, निविदा अंतिम टप्प्यात


मुंबई(खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या दवाखान्यांसह आरोग्य केंद्र आणि विशेष रुग्णालयांमध्ये हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे 'आपली चिकित्सा' योजना अचानक बंद पडल्यानंतर यासाठी मागवण्यात आलेल्या निविदेला अखेर यश आले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मागवलेल्या निविदेमध्ये पाच कंपन्यांनी स्वारस्य दाखवले असून अखेर निविदा अटींमध्ये बदल केल्यानंतर महापालिकेच्या या योजनेसाठी तीन पेक्षा जास्त कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे. यामध्ये सध्या देवू केलेल्या ८६ रुपयांच्या चाचणीच्या दराऐवजी १४० रुपये एवढा दर अंदाजित केला असून त्यानंतरच या योजनेसाठी विविध कंपन्या पुढे आल्याचे दिसून येत आहे.


मुंबई महापालिकेची रुग्णालये, दवाखाने, प्रसुतीगृह आदी ठिकाणी हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे चिकित्साअंतर्गत खासगी प्रयोग शाळांच्या माध्यमातून चिकित्सा सुविधा सुरु करण्यासाठी महापालिकेने निविदेत पात्र ठरलेल्या क्रस्ना डायग्नोस्टीक सेंटरची निवड केली. शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे तिन्ही विभागांसाठी ही संस्थेची निवड करण्यात आली आहे. या संस्थेने मुलभूत चाचण्यांकरता प्रति रक्त नमुना ८६ रुपये व विशेष तथा प्रगत चाचण्यांकरता प्रति रक्त नमुना करता ३४४ रुपये एवढा दर आकारला आहे. त्यामुळे या संस्थेची निवड करत यासाठी सुमारे २७ कोटी ५२ लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली गेली. फेब्रुवारी २०२३ पासून क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटर संस्थेच्या माध्यमातून हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे चिकित्सा अंतर्गत विविध चाचण्यांची सुविधा गरीब रुग्णांना पुरवली जात आहे. ही निवड चार वर्षांकरता होती. परंतु डिसेंबर २०२४ पासूनच या संस्थेने पुढे काम करण्यास नकार दिला होता. त्यामुळे महापालिकेच्यावतीने नव्याने निविदा मागवण्याची प्रक्रिया सुरु होती.


या निविदेमध्ये १४० चाचण्यांच्या तुलनेत नव्याने मागवलेल्या निविदेत ८० चाचण्या करण्याचे प्रस्तावित केले होते. यासाठी मूलभूत चाचण्या या १०१ ऐवजी ५५ आणि प्रगत चाचण्यांसाठी ३९ ऐवजी ३५ असे प्रमाण केंले होते. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या कंत्राटातील रकमेतील ८६ रुपये प्रति चाचणीच्या दराऐवजी १४० रुपये एवढा दर अंदाजित करून यासाठी निविदा मागवली होती. यामध्ये क्रस्ना डायग्नोस्टीकसह अन्य चार संस्थांनी भाग घेतला असून लवकरच यातील पात्र कंपन्यांची निवड करून त्यांच्या मार्फत केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. महापालिकेने अंदाजित केलेल्या दरापेक्षा जो कमी दर आकारणाऱ्या संस्थेची निवड केली जाईल असेही प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी

Eknath Shinde : राखीच्या धाग्यातून महिलांना मोठी ग्वाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘लाडक्या बहिणीं’ना आश्वासन

राखीच्या धाग्यातून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा शब्द - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही माविम आणि उमेद

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबई-मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्

Mumbai Indians : मुंबईत उतरलं ‘मुंबई इंडियन्स’चं खास विमान; Malaysia Airlinesच्या A330ची पहिली लँडिंग, क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या निळ्या-गोल्डन रंगांनी सजलेलं Malaysia Airlinesचं खास Airbus A330-300 विमान बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबईत

Devendra Fadnavis : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)